मोनिका लिवेन्स्की म्हणजे ताण घालवायचा एक मार्ग होता- बिल क्लिंटन

बिल क्लिंटन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बिल क्लिंटन आणि मोनिका लिवेन्स्की

मोनिका लिवेन्स्कीबरोबरचं प्रेमप्रकरण म्हणजे त्यावेळी ताण घालवायचा एक मार्ग होता असं वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केलं आहे.

हिलरी क्लिंटन यांनी 2016 यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांच्या सार्वजनिक आयुष्यावर हिलरी नावाचा एक माहितीपट तयार करण्यात आला आहे. त्यात बिल क्लिंटन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मोनिका लिवेन्स्की यांच्यासोबत असलेले नातं चौकशी अधिकाऱ्यांपासून लपवल्याबाबत त्यांच्यावर 1998 मध्ये महाभियोगाची कारवाई करण्यात आली होती. सिनेटच्या कारवाईतून त्यांची मुक्तता करण्यात आली होती.

क्लिंटन आणि लिवेन्स्की यांचे प्रेमसंबंध होते तेव्हा ती 22 वर्षांची होती.

हुलू या माहितीपटाची निर्मिती करणाऱ्या कंपनीशी बोलताना ते म्हणाले, "मी जे केलं ते वाईट होतं. पण चला आता मूर्खपणा करून पाहूया आणि तो केला अशातला भाग नाही."

"कधीकधी असं वाटतं की तुम्ही एखाद्या धक्क्यात आहात. 15 फेऱ्यांचा एखादा खेळ मग 30 फेऱ्यांचा होतो. त्यामुळे तिथून मन वळवण्यासाठी असं काही मिळतं. प्रत्येकाला आयुष्यात प्रचंड ताणतणाव असतात, भीती असते, नैराश्य येतं. अशा वेळी त्यातून बाहेर निघण्याचा हा एकच मार्ग असतो. म्हणूनच मी पुढची अनेक वर्षं मी काळजीमुक्त झालो."

फोटो स्रोत, EPA

1990 च्या दशकात बिल क्लिंटन आणि मोनिका लिवेन्स्की यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या प्रचंड गाजल्या होत्या. आधी त्यांनी या प्रेमप्रकरण नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र तिच्याशी शारीरिक संबंध असल्याची कबुली दिली होती.

1998 मध्ये प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांना, "माझे त्या स्त्रीशी लैंगिक संबंध नाहीत." असं वक्तव्य करून प्रतिसाद दिला होता. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात ते वाक्य फार गाजलं होतं.

बिल क्लिंटन यांच्याबरोबरचे संबंध परस्परसंमतीने असल्याचं लिवेन्स्की यांचं म्हणणं होतं. मात्र तो पदाचा गैरवापर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

मोनिका लिवेन्स्की

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मला त्यांच्या हातचा बाहुला केलं असं त्यांनी व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

या प्रेमप्रकरणाचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नव्हती आणि नंतर त्याचा प्रचंड पश्चाताप झाल्याचं त्यांनी सांगितलं.

लिवेन्स्कीच्या आयुष्याची व्याख्या म्हणजे आमचं नातं अशी करण्यात आली आहे. याचं मला प्रचंड वाईट वाटतं असं बिल क्लिंटन या मुलाखतीत म्हणाले.

"गेल्या अनेक वर्षांपासून तिचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून मी प्रयत्न करत आहे. पण आता सुरळीत शब्दाची व्याख्या काय आहे हेही महत्त्वाचं आहे." ते म्हणाले.

जेव्हा या प्रकरणाबदद्ल हिलरी यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "मी वैयक्तिक पातळीवर प्रचंड दुखावले होते. माझा अजिबात विश्वास बसला नाही. ते सगळं फार भीषण होतं. जर हे सार्वजनिक होणार असेल तर चेलसाला (त्यांच्या मुलीला) सांगायला हवं."

जेव्हा हे सगळं बाहेर आलं तेव्हा त्यांच्याबरोबर कोणतंच नातं ठेवायचं नव्हतं असंही हिलरी म्हणाल्या.

"मी माझ्या नवऱ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. काही लोकांना तो योग्य निर्णय वाटला तर काही लोकांना अयोग्य."

मुलीला या प्रेमप्रकरणाची कल्पना देणं अतिशय लाजिरवाणं होतं असं बिल क्लिंटन म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)