कोराना व्हायरस : तेल युद्ध अखेर शमलं, OPEC उत्पादन कमी करणार

फोटो स्रोत, TASS / Getty Images
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जगभरातून कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळेच तेलउत्पादक राष्ट्रांची संघटना असलेल्या OPECने तेलाचं उत्पादन 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी (12 एप्रिल) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला. तेल उत्पादनात करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कपात आहे.
OPEC ही तेल उत्पादक देशांची संघटना आहे. या संघटनेचे सदस्य देश तसंच सदस्य नसलेले पण संलग्न अशा रशियासारख्या तेल उत्पादक देशांनी 9 एप्रिललाच तेल उत्पादनावर निर्बंध आणण्यासंबंधी विचार केला होता. पण मेक्सिकोनं याला विरोध केला होता.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
OPEC नं तेल उत्पादनातील कपातीसंबंधीचा हा प्रस्तावासंबंधी अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी अन्य राष्ट्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
OPEC चे सदस्य आणि संलग्न देशांनी तेलाचं उत्पादन प्रतिदिन 97 दशलक्ष बॅरलनं कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालं आहे.
हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण केवळ OPEC ची सदस्य राष्ट्रंच नाहीत कर जगातील सर्वांत मोठा तेलपुरवठादार देश असलेला अमेरिका आणि G-20 संघटनेच्या अन्य सदस्य देशांनाही या निर्णयाला मान्यता दिली आहे.
तेलाचं उत्पादन कमी केलं जाणार असून जो उपलब्ध साठ्याचा काही भागही राखून ठेवला जाणार असल्याचं तेलविषयाचे अभ्यासक सँडी फिल्डन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि कुवेतचे उर्जामंत्री डॉ. खालेद अली मोहम्मद अल्-फादेल यांनी ही बातमी ट्वीट केली आहे. तर सौदी अरबच्या उर्जा मंत्रालयानं आणि रशियाची सरकारी वृत्तसंस्था टासनंही रविवारी (12 एप्रिल) घेतलेल्या या निर्णयाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील तीन अब्ज लोक आपापल्या घरातच लॉकडाऊन झाले आहेत. त्यामुळे तेलाची मागणी जवळपास तिपटीनं कमी झालीये.
मार्च महिन्यात तेलाच्या किमती गेल्या 18 वर्षातील नीचांकी पातळीवर गेल्या होत्या. तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात OPEC मध्ये सहमती न झाल्यानं तेलाच्या किमती घसरल्या होत्या.
रशिया आणि सौदी अरेबियामध्ये मतभेद झाल्यामुळे तेलउत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात अपयश आलं होतं. मात्र हे दोन्ही देश आपले मतभेद संपुष्टात आणतील, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केल्यानंतर 2 एप्रिलला तेलाच्या किमती सावरल्या होत्या.
गुरुवारी (9 एप्रिल) तेलउत्पादन कपातीसंबंधीच्या प्रस्तावाचा प्राथमिक आराखडा मांडण्यात आला, त्यात OPEC आणि संलग्न राष्ट्रांनी 10 दशलक्ष बॅरल प्रतिदिन किंवा जागतिक पुरवठ्याच्या 10 टक्के इतकी तेल उत्पादन कपात 1 मे पासून करावी, असं म्हटलं होतं.
OPEC शी संबंधित नसलेले अमेरिका, कॅनडा, ब्राझील, नॉर्वे हे देश उर्वरित 50 दशलक्ष बॅरल्सची कपात करतील, असं म्हटलं होतं.
जुलै आणि डिसेंबरच्या दरम्यान तेल उत्पादनातली कपात 8 दशलक्ष बॅरल्स इतकी केली जाईल, असंही या प्रस्तावात नमूद होतं. जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 च्या दरम्यान ही कपात 6 दशलक्ष बॅरल्सपर्यंत करण्यात येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)