We Are One: कोरोना लॉकडाऊनमुळे युट्यूबवर ‘मामी’सह जगभरातले फिल्म फेस्टिव्हल एकत्र येणार

मामी 2019 मध्ये करण जोहर आणि किरण राव

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

मामी 2019 मध्ये करण जोहर आणि किरण राव

जगातली प्रसिद्ध बर्लिन, कान, टोरंटो, व्हेनिस आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स युट्यूबवरच्या एका ऑनलाईन इव्हेंटसाठी एकत्र आले आहेत

युट्यूबवर 29 मे पासून वी आर वन : अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (We Are One : A Global Film Festival) हा ऑनलाईन फिल्म फेस्टिव्हल होईल.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द झाले. यासोबतच जगभरातली फिल्म इंडस्ट्रीही सध्या ठप्प आहे.

10 दिवसांच्या या ऑनलाईन फिल्म फेस्टिव्हलद्वारे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO साठी निधी उभारण्यात येणार आहे.

या ऑनलाईन फेस्टिव्हलसाठी जगभरातली 20 फिल्म फेस्टिव्हल्स एकत्र आले आहेत. यात मुंबई फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच MAMI, BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल, जेरुसलेम फिल्म फेस्टिव्हल, कान फिल्म फेस्टिव्हल, बर्लिन फिल्म फेस्टिव्हल, ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल्सचा समावेश आहे.

कोव्हिडमुळे यापैकी अनेक फिल्म फेस्टिव्हल पुढे ढकलावे लागले आहेत. या व्हायरसमुळेच गेल्या महिन्यात कान फिल्म फेस्टिव्हलही पुढे ढकलण्यात आला होता.

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन,

अल पचिनो, मार्टिन स्कॉर्सेसी आणि रॉबर्ट डी निरो गेल्या वर्षीच्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येअल पचिनो, मार्टिन स्कॉर्सेसी आणि रॉबर्ट डी निरो गेल्या वर्षीच्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये

त्यानंतर यासाठी अभिनेते रॉबर्ट डी निरो यांच्या ट्रिबेका आणि न्यूयॉर्कच्या जेन रोजेंथल यांनी या ऑनलाईन फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेतला.

"या निमित्ताने जगभरातले फिल्म फेस्टिव्हल आयोजक, कलाकार आणि कथाकार एकत्र येतील आणि त्यातून जगभरातल्या प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळेल," अशी आशा या आयोजकांनी व्यक्त केलीय.

जेन रोजेंथल सांगतात, "एकमेकांतल्या सीमा आणि मतभेद ओलांडत लोकांना प्रेरित करण्यात, एकत्र आणण्यात सिनेमाची भूमिका किती महत्त्वाची आहे याबद्दल आपण अनेकदा बोलतो. यामुळे जखमा भरून येतात, आणि सगळ्या जगाला सध्या याची गरज आहे."

या मोफत ऑनलाईन फेस्टिव्हलमध्ये फिल्म, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरी, संगीत, कॉमेडी आणि चर्चा या सगळ्याचा समावेश असेल. पुढच्या महिन्यात याचं वेळापत्रक उपलब्ध होईल.

या ऑनलाईन फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं कान फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV