बेडकाचं विष हुंगल्याने फोटोग्राफरचा मृत्यू, पॉर्नस्टारची चौकशी

नाचो विडाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नाचो विडाल

बेडकाचं विष हुंगल्याने एका फोटोग्राफरचा मृत्यू झाल्यानंतर स्पॅनिश पॉर्नस्टार नाचो विडाल याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय.

उत्तर अमेरिकेतल्या एका दुर्मिळ बेडकाचं विष हुंगल्याने या फोटोग्राफरचा मृत्यू झाल्याचं स्पॅनिश पोलिसांनी म्हटलंय. एका गूढ विधीसाठी हे करण्यात आल्याचा संशय आहे.

गेल्या जुलै महिन्यात नाचो विडाल याच्या वॅलेंशिया शहरातल्या घरी हा विधी करण्यात आल्याचा संशय आहे.

मृत्यू दुर्दैवी असून आपला अशील निरपराध असल्याचा दावा विडाल यांच्या वकिलाने केलाय.

या फोटोग्राफरचं नाव होजे लुईस असल्याचं स्पॅनिश माध्यमांनी म्हटलंय. या फोटोग्राफरने हे पाईपद्वारे हे दुर्मिळ बेडकाचं विष हुंगलं.

हे विष बुफो अल्वेरिअस (Bufo Alvarius) प्रजातीच्या बेडकाच्या ग्रंथींमधून गोळा करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

याच बेडकाला कोलोरॅडो रिव्हर टोड असंही म्हटलं जातं. मेक्सिको आणि अमेरिकेच्या नैऋत्येकडील राज्यांमधल्या सोनोरन वाळवंटात आढळणारा हा बेडूक या विषाचा वापर स्वतःचा बचाव करण्यासाठी करतो.

बेडकाच्या ग्रंथींमधून निघणाऱ्या या द्रव्याला रसायनशास्त्रात 5-MeO-DMT नाव आहे. एखाद्या व्यक्तीने त्याचं सेवन केल्यास त्याने मन तीव्र उत्तेजित होतं. (Intense psychedelic state) म्हणूनच याला गॉड मॉलेक्यूल (God Molecule) असंही म्हटलं जातं.

हा पदार्थामध्ये अँक्झायटी आणि डिप्रेशन म्हणजेच नैराश्यवरच्या उपचारासाठीचे काही गुण आढळल्याचं 2019 मधल्या एका संशोधनात म्हटलं होतं. पण याचा माणसांवर नेमका काय परिणाम होतो याची मर्यादित माहिती उपलब्ध असल्याचंही यात म्हटलं होतं.

विडाल यांनी त्यांच्या युट्यूब व्हीडिओंमधून यापूर्वीही बेडकाच्या विषाच्या वापराचा सल्ला दिला होता, असं एल पेस (El País) नावाच्या स्पॅनिश वर्तमानपत्राने म्हटलंय.

आतापर्यंत शेकडो पॉर्न सिनेमांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याची गेल्या 11 महिन्यांपासून फोटोग्राफरच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू असल्याचं स्पॅनिश पोलिसांनी सांगतलं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मनुष्यवध आणि सार्वजनिक आरोग्यासाठीच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपाखाली विडाल आणि आणखी दोन संशियतांना अटक करण्यात आली आणि नंतर काही अटींवर त्यांना सोडण्यात आलं.

वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली नियमितपणे बेडकाच्या विषप्रयोगाचे विधी केले जात असल्याचं तपास पथकांना आढळलंय.

पण 'वरवर निरुपद्रवी वाटणारा पारंपरिक विधी' आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करणारा असला तरी सहज एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे वा एखाद्या रोगावर वा व्यसनावर विश्वास ठेवणारे लोक एक पर्याय म्हणून याकडे आकर्षित होत असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलंय.

तर या फोटोग्राफरने यापूर्वीही या पदार्थाचं सेवन केलं होतं आणि त्याला ते 'कम्फर्टेबल' वातावरणामध्ये पुन्हा करून पहायचं होतं असं विडाल याचे वकील डॅनियल सॅल्वाडोर यांनी म्हटलंय.

विडाल यांनी ही विधी घडवून आणल्याच्या आरोपांचंही त्यांनी खंडन केलंय.

"मृत्यू झालेली व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाचा आम्हाला आदर आहे. पण या व्यक्तीने स्वतःहून विषाचं सेवन केल्याचं नाचो यांचं पहिल्यापासून म्हणणं आहे," ला वँग्वारर्डिया वर्तमानपत्राशी बोलताना वकिलाने सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)