बैरुतच्या बंदर परिसरात पुन्हा मोठी आग, आकाशात धुराचे लोट

फोटो स्रोत, EPA
लेबननमधील बैरूत बंदरावर मोठी आग लागली आहे. महिन्याभरापूर्वीच बैरूतमध्ये झालेल्या भयंकर स्फोटात जवळपास 190 जणांचा जीव गेला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेनं सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकला आहे.
बंदरावरील ड्युटी-फ्री झोनमध्ये असलेल्या कच्चतेल आणि टायरच्या गोदामात आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या, तसंच आकाशही धुरानं व्यापलं.
आगीची घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तसंच, कुठलीही जीवितहानी झाल्यालाही अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
अग्निशमन दल तातडीने घटनास्थळावर पोहोचलं. शिवाय, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर्सही पाठवण्यात आले आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं लेबननमधील 'रेड क्रॉस' या समाजसेवी संस्थेचे प्रमुख जॉर्ज केट्टनेह यांच्याशी बाचतीत केली. केट्टनेह यांच्या माहितीनुसार, आगीनंतरच्या धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.
बैरूत स्फोटामुळे माझी 20 वर्षांची मेहनत वाया गेली
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)