दुबईः न्यूड फोटोशूट करणाऱ्या 11 महिलांना युएईमधून करणार डिपोर्ट

दुबई

फोटो स्रोत, Getty Images

दुबईमध्ये न्यूड फोटोशूट करताना सार्वजनिक नग्नतेच्या आरोपांतर्गत 11 महिलांना अटक करण्यात आली आहे.

न्यूड फोटोशूट करणाऱ्या या गटाला त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अटक केलेल्यांमध्ये 12 युक्रेनी महिला आणि एक रशियन पुरूषाचा समावेश आहे.

शनिवारी ऑनलाइन पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये, काही महिला घराच्या बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत उभ्या असताना दिसल्या. या महिलांचं फोटोशूट सुरू होतं.

दुबईमध्ये सार्वजनिक नग्नतेच्या आरोपांतर्गत सहा महिने जेल आणि 5000 दिराम (1 लाख रुपये ) शिक्षेची तरतूद आहे. यूएईमध्ये अनेक कायदे शरीया कायद्यावर आधारित आहेत. याआधी देखील सार्वजनिक ठिकाणी प्रेम किंवा समलिंगी संबंधाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात लोकांना जेलची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

अटकेची पहिली कारवाई नाही

दुबईमध्ये "सार्वजनिक नैतिकतेला बाधा येईल" अशा कोणत्याही गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करण्यावर निर्बंध आहेत. या गोष्टी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल, अशी सूचना दुबई पोलिसांनी जारी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "अशा प्रकारचं वागणं समाजात स्वीकारलं जात नाही आणि नैतिकतेच्या नियमात बसत नाही."

दुबईमध्ये रहाणाऱ्या किंवा परदेशी पर्यटकांसाठी या गोष्टी लागू आहेत. पर्यटकांना या नियमातून सूट दिली जात नाही. गेल्याकाही वर्षात सुट्टीवर दुबईमध्ये आलेल्या काही हाय-प्रोफाईल पर्यटकांना ताब्यात घेण्याच्या घटना घडल्या आहेत.

एका ब्रिटिश महिलेला 2017 मध्ये एका व्यक्तीसोबत परस्पर सहमतीने सेक्स केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

लग्न न करता या व्यक्तीशी सेक्स केल्यामुळे या महिलेला शिक्षा देण्यात आली होती. ही महिला या व्यक्तीकडून धमकी मिळत असल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली होती. पण, तिच्या संबंधांची माहिती मिळताच पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)