Tokyo Olympics : पुरुष हॉकी संघ 49 वर्षांनंतर उपांत्य फेरीत; ब्रिटनवर केली मात

टोकियो ऑलिम्पिक

फोटो स्रोत, Alexander Hassenstein

फोटो कॅप्शन,

दिलप्रीत सिंग

भारतीय हॉकी संघाने ब्रिटनच्या संघावर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक यांनी प्रत्येकी एक गोल करत

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदकं आहेत. शेवटचं पदक 1980 मध्ये भारताने मिळवलं होतं. त्यावेळी उपांत्य फेरी नव्हती.

1980च्या पदकानंतर भारतीय हॉकीची घसरण झाली. तो काळ जागवण्याची संधी भारतीय पुरुष संघाकडे आहे.

उपांत्य फेरीत भारतीय संघाचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे.

टोकियात, पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-1 असा धुव्वा उडवला होता. मात्र त्या पराभवातून सावरत भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली.

सिंधूला कांस्य

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने 52 मिनिटाच चीनच्या हे बिंग जिआओवर 21-13, 21-15 असा विजय मिळवला.

पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती. शनिवारी उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्याने सिंधूला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावं लागलं.

खणखणीत स्मॅशचे फटके हे सिंधूच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. डावखुऱ्या जिआओविरुद्ध खेळताना अचूक डावपेचांसह खेळताना सिंधूने तिला सतत निरुत्तर केलं.

पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-0 अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर बिंगने चांगलं प्रत्युत्तर देत 5-5 अशी बरोबरी केली. सिंधूने तडाखेबंद स्मॅशेसच्या बळावर 11-8 अशी आघाडी घेतली. चांगला खेळ कायम करत सिंधूने 15-9 अशी आघाडी वाढवली. उत्तम बचावाचं प्रदर्शन करत सिंधूने 18-11 अशी बढत घेतली.

नेटजवळून शिताफीने फटके लगावत, ड्रॉप शॉटचा हुशारीने उपयोग करत सिंधूने पहिला गेम 21-13 असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही सिंधूने 4-1 अशी खणखणीत आघाडी घेतली. क्रॉसकोर्ट स्मॅशच्या बळावर सिंधूने 11-8 अशी आघाडी वाढवली. बिंगने सिंधूवर जोरदार आक्रमण करत स्मॅशेसचा मारा केला. बिंगने ड्रॉप शॉट आणि नेटजवळून चांगला खेळ करत 11-11 अशी बरोबरी केली.

सिंधूने रॅलीचा वेग नियंत्रित करत बिंग आगेकूच करणार नाही याची काळजी घेतली. दुसरा गेम गमावल्यास सामना गमावण्याची भीती लक्षात घेऊन बिंगने पल्लेदार रॅली खेळण्यास सुरुवात केली. मात्र सिंधूने फटक्यातली अचूकता वाढवत बिंगला निष्प्रभ करत बाजी मारली.

रविवारच्या अन्य लढतीत

भारताचा बॉक्सर सतीश कुमार याला बॉक्सिंग खेळप्रकारात सुपर हेवी वेट 91+ किलो गटात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला जागतिक क्रमवारीत क्रमांक एकवर असलेल्या बाखोदिर जालालोव्ह याने 0-5 अशा फरकाने पराभूत केले.

सतीश कुमार या पराजयामुळे स्पर्धेबाहेर पडला असला तरी त्याने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

सतीशने जखमी असूनही खेळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याने शक्य त्या प्रकारे जालालोव्हला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

पण अखेरीस त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सतीश कुमारचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

सतीश कुमारचा मागचा सामना जमैकाच्या खेळाडूविरुद्ध झाला होता. या सामन्यात त्याला विजय मिळाला. पण त्याच्या हनुवटी आणि उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला टाके घालावे लागले होते.

या दुखापतीमुळे सतीश पुढील सामन्यात खेळणार की नाही, हे निश्चित नव्हतं. अखेरच्या क्षणी त्याला वैद्यकीय पथकाकडून त्याची परवानगी मिळाली. त्यानंतर सतीश क्वार्टर फायनल सामन्यात सहभागी झाला.

विजयी खेळाडूनेही केलं कौतुक

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरचा 32 वर्षीय सतीश कुमार हा भारतीय लष्करात कार्यरत आहे.

सामना जिंकल्यानंतर जालालोव्हने सतीशच्या कामगिरीचं कौतुक केलं.

फोटो स्रोत, Getty Images

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंह पटेल यांनी याविषयी PTI वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

ते म्हणाले, सतीश कुमारने आपल्या देशासाठी आज ते केलं, जे खूपच कमी लोक करू शकतात.

सोशल मीडियावरही नागरिक सतीश कुमारचं कौतुक करताना दिसत आहेत.

सतीश कुमारला कॉमनवेल्थ स्पर्थेत रौप्य पदक तर एशियन गेम्समध्ये दोनवेळा कांस्य पदक मिळालेलं आहे. तसंच त्याने नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपही अनेकवेळा जिंकली आहे.

सुपर हेवीवेट गटातून बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा सतीश कुमार भारताचा पहिलाच खेळाडू आहे. ही कामगिरी करून त्याने इतिहास घडवला होता

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)