तालिबान: अफगाणिस्तानात लष्कर पाठवण्याचा निर्णय अतिशय चुकीचा- ट्रंप

डोनाल्ड ट्रंप, जो बायडन, अमेरिका, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

डोनाल्ड ट्रंप

अफगाणिस्तानात लष्कर पाठवण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचं मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं आहे.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रंप यांनी हे उद्गार काढले.

आम्ही मध्यपूर्व भागाचा विनाश केला. यापायी आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले. हजारो सैनिक कामी आले. त्याने काहीही फरक पडला नाही. अमेरिकेच्या इतिहासात घेण्यात आलेला हा सगळ्यांत चुकीचा निर्णय होता.

दरम्यान मंगळवारी 13 लष्करी विमानांद्वारे हजारहून अधिक अमेरिकेच्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलं. व्हाईट हाऊसने यासंदर्भात माहिती दिली.

आतापर्यंत अफगाणिस्तानमधून 3,200 अमेरिकेच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2,000 अफगाण नागरिक अमेरिकेत पोहोचले आहेत.

अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेण्याच्या निर्णयासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका होते आहे.

तालिबानचे नेते कतारमधून परतू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सैन्याने माघार घेण्यासंदर्भात हे नेते अमेरिकेशी वाटाघाटी करत होते.

यामध्ये तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादार यांचाही समावेश आहे.

महिलांना शरियतप्रमाणे काम करता येईल असं तालिबानने घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

20,000 अफगाण नागरिकांना आम्ही सामावून घेऊ असं युकेने म्हटलं आहे. महिला आणि लहान मुलांना प्राधान्य देण्यात येईल असं युकेने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)