जीवन संपवण्यासाठी मदत म्हणून सुसाईड पॉडची निर्मिती, स्वित्झर्लंडमध्ये होणार लाँच

  • जेव वेकफिल्ड
  • तंत्रज्ञान प्रतिनिधी
स्वित्झर्लंड

फोटो स्रोत, SARCO

जगातल्या काही देशांमध्ये जीवन संपवण्यासाठी मदत मिळू शकते. पण हे लक्षात घ्यायला हवं की, कोणीही जीवन संपवू शकत नाही.

जे अतिशय आजारी आहेत आणि लवकरच मृत पावणार आहेत, पण तो मृत्यू हालहाल करून त्यांच्या वाटेला येईल अशी माणसं किंवा जे अंथरूणाला खिळून आहे आणि दिवसागणिक त्यांचा एकेक अवयव निकामी होत चाललाय, असेच लोक अर्ज करून जीवन संपवण्यासाठी मदत मिळवू शकतात.

स्वित्झर्लंडमध्ये अशा प्रकारे जीवन संपवणं, ज्याला असिस्टेड सुसाईड म्हणतात, कायदेशीर आहे. 2020 मध्ये जवळपास 1300 लोकांनी अशा प्रकारे आपलं जीवन संपवलं.

अशाच प्रकारच्या जीवन संपवण्याला मदत व्हावी म्हणून एका कंपनीने 'सुसाईड पॉड' बनवले आहेत. हे एक 3 डी प्रिंटेड पॉड आहे.

शवपेटीच्या आकारासारख्या असलेल्या या पॉडमध्ये काही मिनिटात कोणत्याही वेदनेशिवाय मृत्यू होऊ शकतो, असा हे पॉड बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे.

सॅक्रो असं या पॉडचं नाव आहे. या पॉडमधला ऑक्सिजन हळूहळू कमी होत जातो आणि मग आतल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, पण ही प्रक्रिया संपूर्णपणे वेदनारहित असल्याचा त्यांचा दावा आहे.

स्वित्झर्लंडमध्ये मदत घेऊन केलेल्या आत्महत्येला परवानगी असल्यामुळे पुढच्या वर्षापासून हे सॅक्रो पॉड तिथे वापरले जाऊ शकतील असा कंपनीला विश्वास आहे.

सॅक्रोने स्वित्झर्लंडमधल्या एका कायदेतज्ज्ञाची मदत घेतली. या तज्ज्ञाने अभ्यास करून सांगितलं की, या मशिनमुळे देशातल्या कुठल्याही कायद्यांचा भंग होत नाही.

पण, इतर वकिलांना या निष्कर्षांबद्दल संशय आहे.

स्वेच्छा मरणात मदत करणारी संस्था डिग्नीटासचं म्हणणं आहे की, अशा 'पॉडचा इथे फारसा स्वीकार होणार नाही.'

कायदेशीर वाद

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

स्वेच्छा मरणासाठी स्वित्झर्लंडमध्ये सध्या जी पद्धत वापरली जाते, त्यात काही वेगवेगळी पेयं व्यक्तीला प्यायला दिली जातात. ज्यामुळे त्या माणसाचा मृत्यू होतो.

या पॉडमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवून आतल्या ऑक्सिजनचं प्रमाण वेगात कमी होतं. यामुळे आतल्या व्यक्तीची शुद्ध हरपते आणि दहा मिनिटात तिचा मृत्यू होते.

हे सुसाईड पॉड आतून सुरू करता येतं आणि त्यात एक इमर्जन्सी बटन पण आहे.

डॅनियल ह्युर्लिमान कायदेतज्ज्ञ आहेत तसंच सेंट गॅलन विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना सॅक्रोबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "हा पॉड म्हणजे कोणतंही वैद्यकीय उपकरण नाही. त्यामुळे स्वीस थिरेप्युटित कायद्याच्या कक्षेअंतर्गत हे येणार नाही."

त्यांना असंही वाटतं की नायट्रोजन वापर नियंत्रित करणाऱ्या कायद्यांचाही याला विरोध होणार नाही.

"याचाच अर्थ असा की या पॉडला स्वीस कायद्याच्या कक्षेअंतर्गत येणार नाही."

स्वेच्छामरणात मदत करणारी संस्था डिग्नीटासच्या मते, "गेली 35 वर्षं दोन स्वीस एक्झिट ग्रुप आणि 23 वर्षं डिग्नीटास यांनी स्वेच्छा मरणाची, ज्याला इथे असिस्टेड सुसाईट म्हणतात, एक पद्धत तयार केलीये. यात तज्ज्ञ डॉक्टर्स असतात, प्रशिक्षित स्टाफ असतो आणि हे लोक त्या व्यक्तीला शेवटचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मदत करतात.

"इतकी सुरक्षित आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घडणारी प्रक्रियेच्या जागी एक कुठलीशी स्वतःच एकट्याने चावायची कॅप्सुल स्वित्झर्लंडमध्ये स्वीकारली जाईल, असं वाटत नाही."

मृत्यूचे डॉक्टर

जर या मशिनला स्वित्झर्लंडमध्ये मान्यता मिळाली तरी हे दुकानात विकत मिळणार नाही. त्याऐवजी या मशिनच्या ब्लुप्रिंट फुकटात उपलब्ध होतील आणि कोणीही त्या डाऊनलोड करू शकेल.

हे मशीन तयार करणारे डॉ. फिलिप नितश्के यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की त्यांना, "मरणाच्या प्रक्रियेत होणारा वैद्यकीय हस्तक्षेप थांबवायचा आहे."

"जे स्वेच्छामरणाला सामोरं जाताहेत त्यांचंच या प्रक्रियेवर नियंत्रण असावं. यात मानसिक संतुलनाचा रिव्ह्यू नको असं आम्हाला वाटतं."

डॉ. फिलिप नितश्के गेली अनेक वर्षं 'मरणाच्या हक्का' साठी मोहीम चालवत आहेत. त्यांना 'मृत्यूचा डॉक्टर' असं नावदेखील पडलंय.

या सॅक्रो पॉडचे सध्या दोन प्रोटोटाईप तयार आहेत आणि तिसरं नेदरलँड्समध्ये बनतंय.

आत्महत्यांना ग्लॅमरस बनवणारं या पॉडचं डिझाईन आहे, अशी टीकाही डॉ फिलिप नितश्के यांच्यावर झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)