Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

थोडक्यात

  1. परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी
  2. 22 जणांचा मृत्यू
  3. जखमींवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

थेट अहवाल देणे

सर्व वेळा यूके आधारित आहेत

अपडेट्ससाठी पहात रहा बीबीसी मराठी वेबसाईट

शेवची हाती आलेल्या वृत्तानुसार चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांची संख्या २२ असून ३९ जण जखमी आहे. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेसंदर्भातील ताजा तपशील वेबसाईटवर देत राहू.

सध्या हे लाईव्ह पेज इथेच थांबवत आहोत.

अपडेट्ससाठी पाहात रहा - बीबीसी मराठी.

चौकशीसाठी स्वतंत्र समिती

मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एल्फिन्स्टन-परळ रेल्वे पुलावर आज सकाळी 10.45 वाजता ऐन गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. जखमींवर मुंबईतील केइएम रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यात रेल्वेमंत्री पियूष गोयल हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

'पत्रा तोडून आम्ही लोकांचे जीव वाचवलेत'

झगडूराम बरसाती जैस्वाल सांगत आहेत त्यांचा अनुभव

'पत्रा तोडून आम्ही लोकांचे जीव वाचवलेत, एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी नव्हता.'

दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे - अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

View more on twitter

आपल्याला बुलेट ट्रेनची खरंच गरज आहे का?

आपल्याला बुलेट ट्रेनची खरंच गरज आहे का? आपल्या सामाजिक भानाबद्दल काय? असे प्रश्न दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुंबईतल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल उपस्थित केले आहे.

#elphinstonestampede Wat v really need a Bullet train??? Wat about our civic sense??? Horrible!!!!!!!!

रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया

जखमींंची संख्या ३९

चेंगराचेंगरीच्या घटनेत आत्तापर्यंत २२ जण मृत्युमुखी पडले असून जखमींची संख्या ३९ असल्याचं केईएम रुग्मालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

मृतांना एकूण १८ लाखांची मदत जाहीर

रेल्वे पूल चेंगराचेंगरी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

रेल्वे आणि राज्य सरकारखेरीज RailClaimTribunal यांच्याकडून ८ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना एकून १८ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

View more on twitter

मुंबई पोलिसांनी मानले मुंबईकरांचे आभार

रक्तादान करण्याच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद

चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज होती. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी आवाहनही केलं होतं.

मुंबईकरांच्या सकारात्मक प्रतिसादामुळं केईएम रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा जमा झाल्याचं मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे कळवलं आहे.

ThankU Mumbai for the response to request for blood. KEM hospital has rcvd enough to treat the injured. Grateful for responding to the call.

'गर्दीचे पूल तातडीनं बंद करणार'

मुंबईतील रेल्वेच्या पादचारी पुलांची सुरक्षा आणि क्षमतेचं मूल्यांकन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ज्या पुलांवर खूप गर्दी होते, ते सर्व पूल ताबडतोब रुंद करण्यात येतील.

पीयूष गोयलकेंद्रीय रेल्वेमंत्री

रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख

जखमींसाठी १ लाख आणि किरकोळ जखमींना १० हजारांची मदत जाहीर

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेत जखमींंना १ लाख आणि किरकोळ जखमींना १० हजारांची मदत जाहीर केली आहे.

'रेल्वेला सर्वतोपरी सहकार्य करू'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन जारी

"राज्य सरकार रेल्वेला सर्वतोपरी सहकार्य करू आणि या घटनेची सखोल चौकशी करू", असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन

ऐका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

View more on Soundcloud

शेखर कपूर यांचं ट्विट

आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी मुंबईत सर्वाधिक जाणवते. असं ट्विट शेखर कपूर यांनी केलं आहे.

View more on twitter

एल्फिन्स्टन स्टेशन

पश्चिम रेल्वे मार्गावर एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन येतं. या स्टेशनपासून मध्य रेल्वेवरच्या परळ रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर ही घटना घडली.

मुंबई
BBC

घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात

पाहा व्हीडिओ : घटनास्थळी गर्दी पण परिस्थिती नियंत्रणात

एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

मुंबई चेंगराचेंगरीनंतरची स्थिती

वीरेंद्र सेहवागचं ट्विट

'निष्पाप लोकांचे जीव स्वस्त झाले आहेत'

कर भरूनही निष्पाप लोक जीव गमवत आहेत, असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे.

View more on twitter

आतापर्यंत

नेमकं काय झालं?

- चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे, तर किमान 30 जणांवर उपचार सुरू आहेत.

- राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातर्फे शोक व्यक्त.

- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन आणि परळ रेल्वे स्टेशऩ यांना जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर सकाळी 10.30च्या जवळपास चेंगराचेंगरी झाली

- सकाळपासून होत असलेल्या पावसानं पुलावर गर्दी झाली.

- सकाळी 11.45 वाजता 15 मृतदेह केईएम रुग्णालयात आल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी कळविली होती.

- पुढे हाच आकडा 22 वर गेला. यात 18 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

-"पावसामुळं फूट ओव्हर ब्रिजवर गर्दी जमा झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यातच 22 जण मृत घोषित करण्यात आले," असं पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनीही सांगितलं.

- केईएम रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेचे वैद्यकीय अधिकारीही उपचारांमध्ये मदत करत असल्याचं या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी गजानन महापुतकर यांनी कळवलं.

मुंबई
धनंजय सहाणी

रितेश देशमुखकडून संताप व्यक्त

अभिनेता रितेश देशमुख यांनीसुद्धा ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला.

View more on twitter

घटनास्थळी बराच वेळ गोंधळ

आता परिस्थिती नियंत्रणात

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांनी सांगितलं की, घटनास्थळी बराच वेळ गोंधळाची परिस्थिती होती. आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रेल्वेमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

पीयूष गोयल केईएम रुग्णालात

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. एलफिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची त्यांनी विचारपूस केली.

हेल्पलाईन क्रमांक

रेल्वे खात्याकडून विविध हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. नागरीक यावर संपर्क करू शकतात.

View more on twitter

हेल्पलाईन क्रमांक

केईएम रुग्णालय - 9004498888 & 9004497300, चर्चगेट - 22039840, मुंबई सेंट्रल - 23051665, ईपीआर - 24301614

हेल्पलाईन नंबर

पश्चिम रेल्वेतर्फे आपतग्रस्तांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

केईएम रुग्णालय. चर्चगेट, मुंबई सेंट्रलच्या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात.

मुंबई
Twitter

राष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त

मुंबई दुर्घटनेविषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपतींचं ट्विट

View more on twitter

उच्चस्तरीय चौकशी समिती

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांची एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. मुंबईतील घटनेवर त्यांनी तीन ट्विट केलेत. त्यामधून हे जाहीर केलं आहे.

पियूष
Twitter

काय घडलं नेमकं? पाहा व्हीडिओ :

प्रत्यक्षदर्शीनं पाठवलेला व्हीडिओ - धनंजय सहानी यांनी पाठवलेली ही क्लिप.

A UGC video of stampede on the footover bridge in Mumbai

पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या परिवारास प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

View more on twitter

पंतप्रधान यांनी व्यक्त केल्या संवेदना

पंतप्रधान यांनी व्यक्त केल्या संवेदना

पंतप्रधान नरेंध्र मोदी यांनी मुंबईतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. घटनास्थळावरिल परिस्थितीवर रेल्वे मंत्री लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

tweet of narendra modi
Twitter

मुंबई पोलिसांकडून शोक व्यक्त

एलफिन्स्टन दुर्घटनेतल्या नातेवाईकांंचं सांत्वन.

View more on twitter

ए, बी, एबी निगेटिव्ह रक्ताची गरज

केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीशी संपर्क साधण्याचं आवाहन

मुंबई पोलिसांचं ट्विट

मुंबई पोलिसांचं ट्विट
twitter
मुंबई पोलिसांचं ट्विट

मुंबई पोलिसांचं रक्तदात्यांना आवाहन

A निगेटिव्ह आणि AB निगेटिव्ह रक्ताची तातडीनं गरज

रेल्वे पूल चेंगराचेंगरी घटनेतील जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. केईएम रुग्णालयात A निगेटिव्ह आणि AB निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याचं मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. यासंदर्भात केईएम रुग्णालयाच्या ब्लड बँकेशी संपर्क साधावा, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

मुंबईतील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याविषयी ट्विट त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांच्या परिवारांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातलं त्यांचं ट्विट आत्ताच प्रसिद्ध झालं आहे.

मृतांचा आकडा 22 वर

केईएम रुग्णालयात सकाळी 11.45 वाजता 15 मृतदेह आणण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी आधी कळविली होती. त्यांनीच पुढे हा आकडा 22 वर गेल्याचं कळवलं आहे. यात 18 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

चेंगराचेंगरीची विदारक दृश्य

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर घटना घडली त्यावेळची ही दृश्य

एलफिन्स्टन
धनंजय सहाणी
एलफिन्स्टन
धनंजय सहाणी

LIVE : मुंबई चेंगराचेंगरी घटनेचे अपडेट्स

परळ- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी : किमान २२ जण मृत्युमुखी

मुंबईच्या परळ- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ हून अधिक मृत्युमुखी पडले. या घटनेसंदर्भातील ताजे तपशील या लाईव्ह पेजद्वारे देत आहोत.