Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

थोडक्यात

  1. NDAचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, एकट्या भाजपलाच 300 जागांवर विजय
  2. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, घेतली आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची भेट
  3. पाकिस्तान, चीन, अमेरिका, रशिया, श्रीलंका आणि इस्रायलसह जगभरातल्या नेत्यांकडून मोदींचे अभिनंदन
  4. राहुल गांधी अमेठीतून पराभूत, पण वायनाडमधून जाणार लोकसभेत
  5. काँग्रेसच्या जागा थोड्या वाढल्या, पण आघाडीचं देशभरात शतकही नाही
  6. राज ठाकरे म्हणतात हा निकाल 'अनाकलनीय'

थेट अहवाल देणे

सर्व वेळा यूके आधारित आहेत

  1. चला, निरोप घेतो...!

    हुश्श! चला तर मग, याबरोबरच आमचं हे लाईव्ह कव्हरेज इथे थांबवतोय.

    तुम्हाला या सर्व अपडेट्स वाचून, हा नवा फॉर्मॅट पाहून कसं वाटलं, आम्हाला आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर नक्की कळवा.

    आणि हो, लोकसभा निवडणुकीच्याच नव्हे तर इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी आमच्या या पेजेसला नक्की भेट द्या -

    सर्व महत्त्वाच्या तसंच रंजक बातम्यांचा ओघ सतत सुरूच राहणार आहे. धन्यवाद.

  2. 'प्रो-इंकंबन्सी'मुळे पुन्हा भाजप सत्तेत - मोदी

    संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले या निवडणुकीमध्ये प्रो-इंकंबन्सी वेव्हमुळे आम्ही पुन्हा निवडून आलो. आम्ही केलेलं काम हे लोकांच्या पसंतीस उतरलं त्यामुळे त्यांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं. बऱ्याचदा सरकारविरोधात अॅंटी-इंकंबन्सी असते त्यामुळे ते निवडून येत नाहीत. पण आमचं काम लोकांना आवडलं आणि त्यांनी आम्हाला निवडून दिलं. आमच्याकडून काही चुका झाल्याही असतील पण आम्ही घेतलेले परिश्रम लोकांच्या पसंतीस उतरले. हा देश परिश्रमाची पूजा करतो. त्यांनी आमचे परिश्रम पाहिले. जनतेनं नीर-क्षीर विवेकाने आम्हाला निवडून दिलं.

    मोदी
  3. नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

    सतराव्या लोकसभेत एनडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली आहे. संसद भवनात सुरू असलेल्या एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता. आज संध्याकाळी ते पुन्हा एकदा सरकार स्थापन दावा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

    View more on twitter
  4. नरेंद्र मोदींची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड

    नरेंद्र मोदींची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(NDA ) नेतेपदी सर्व संमतीने निवड झाली आहे. पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील हे NDA च्या सर्व घटकपक्षांनी मिळून ठरवलं आहे.

    View more on twitter
  5. राहुल गांधींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली पण काँग्रेसने त्यांचा निर्णय स्वीकारला नाही- रणदीप सुरजेवाला

    काँग्रेसला 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी हार पत्करावी लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली पण काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने त्यांचा हा निर्णय स्वीकारला नाही. काँग्रेसला सध्या तुमच्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे तुम्ही या पदावर कायम राहावे असं समितीने सूचवल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.

    View more on twitter
  6. राज ठाकरेंचा 'हायटेक' प्रचार फेल?

    लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती यायला लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर 'अनाकलनीय' हा एकच शब्द लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

    निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार उभा नसतानाही राज ठाकरेंनी प्रचारसभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

    त्यांच्या प्रचाराचं स्वरूपही अतिशय हटके होतं. मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय आहे, याचं व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे.

    या निवडणुकीच्या निकालांनंतर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल? त्याना मतदारांनी गांभीर्यानं का घेतलं नाही?

    पाहा या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांच्या या व्हीडिओमध्ये.

    View more on youtube
  7. काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल?

    काँग्रेसची पुढची वाटचाल ठरवणारी एक मीटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे.

    View more on facebook
  8. 16 व्या लोकसभेचं विसर्जन

    "16वी लोकसभा विसर्जित करण्याचा केेंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केला आहे. 16 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे," असं राष्ट्रपती भवनाने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    View more on twitter
  9. हिंदुत्व आता नवं नॉर्मल?

    भारतीय समाजात हिंदुत्व आता नवं नॉर्मल ठरत आहे का? नरेंद्र मोदी सरकारच्या विजयानंतर आता भारतीय समाजाने हिंदुत्वाची नवी व्याख्या स्वीकारली आहे का?

    View more on youtube
  10. . .

    .

    राहुल गांधी

    . .

    .

    राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता, असं वृत्त अनेक स्रोतांकडून पुढे येत आहे.

    अधिक वाचा
    next
  11. Dan Egan

    सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर मोदी

    Dan Egan

    नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विजयावर पाकिस्तान आणि आखाती देशातील माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

    अधिक वाचा
    next
  12. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू

    या निकालांनंतर काँग्रेसची पुढची वाटचाल ठरवणारी एक मीटिंग सध्या दिल्लीत सुरू झाली आहे.

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि UPA अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते या बैठकीला दिल्लीतील 24 अकबर रोडवर उपस्थित आहेत.

    काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
    Image caption: काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
  13. युती

    नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? काँग्रेसने यापुढे काय करावं?

    अधिक वाचा
    next
  14. निकालांनंतरची वाटचाल काय?

    नरेंद्र मोदींच्या या विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? मोदींसमोर पुढची 5 वर्षं काय आव्हानं असतील? आणि काँग्रेसने यापुढे काय करावं?

    आम्हीही याच प्रश्नांना घेऊन शुक्रवारी बीबीसी मराठीवर एक विशेष चर्चा घडवून आणली. यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर,पत्रकार स्मृती कोप्पीकर आणि जयदीप हर्डीकर तसंच बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर यांच्याशी संवाद साधला बीबीसी मराठीच्या विनायक गायकवाड यांनी.

    View more on youtube
  15. निवडणूक निकालांनंतरचा तिसरा दिवस

    निवडणूक निकाल येऊन दोन दिवस झालेत. आता वेगवेगळ्या पक्षांच्या हालचालींना खरा वेग येऊ लागलाय आणि त्याच घडामोडींचा वेध आम्ही दिल्ली मुंबईसह देशभरातून घेत आहोत.

    आजच्या महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि NDA सरकार स्थापनेपूर्वीच्या इतर काही घडामोडी.

  16. स्मृती इराणी

    2014 च्या तुलनेत स्मृती इराणींना मिळणारा पाठिंबा वाढला होता पण तरी त्या राहुल गांधींना धोबीपछाड देतील असा अंदाज कोणालाच नव्हता.

    अधिक वाचा
    next
  17. . .

    .

    मोदी

    . .

    .

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावलं आहे. पण त्यांची बहीण प्रियंका गांधीही फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. मग काँग्रेस आता पर्यायी नेतृत्व शोधणार का?

    अधिक वाचा
    next
  18. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाणार

    उध्दव ठाकरे शनिवारी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

    उद्धव
  19. रेड्डी, ममता, पटनायक, स्टालिन

    दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये भाजपाचा विजयरथ रोखण्यात प्रादेशिक पक्षांना यश मिळाले आहे. केरळमध्ये भाजपाला खातेही उघडता आलेले नाही.

    अधिक वाचा
    next
  20. Jane Wakefield

    Corresponsal de Tecnología, BBC

    वंचित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

    Jane Wakefield

    Corresponsal de Tecnología, BBC

    वंचित बहुजन आघाडीमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं घटली का? असा प्रश्न विचारला जात आहे.

    अधिक वाचा
    next