गुरुवारचं हे LIVE पेज आता बंद करण्यात आलं आहे. वाचकांना आता पुढचे अपडेट्स शुक्रवारच्या लाईव्ह पेजवर मिळतील. त्यासाठी इथं क्लिक करा.
कोरोना व्हायरस : जगभरात आज काय घडलं?
1.जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांपेक्षा अधिक
असल्याचं जॉन हॉपकिन्स विद्यापाठीच्या विश्लेषणातून समोर आलं आहे.
2.जगभरात
कोरोना व्हायरसमुळे जवळपास 90
हजार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
3.कोरोना
व्हायरसमुळे जगभरातील50 कोटी
लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले जाईल, असा इशारा ऑक्सफॅमनं दिला आहे.
4.अमेरिकेतल्या
66 लाख
व्यक्तींनी बेरोजगारी भत्ता मिळावा म्हणून सरकारकडे स्वत:ची माहिती नोंदवली आहे.
5.देशातील कोरोना व्हायरसविषयक माहिती दडपल्याचा आरोप चीननं खोडून
काढला आहे.
"चीन अत्यंत जबाबदारीनं आणि पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती
जगापर्यंत पोहोचवत आहे," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिओ लिजान
यांनी म्हटलं आहे.
Getty ImagesCopyright: Getty Images
प्रातिनिधिक फोटोImage caption: प्रातिनिधिक फोटो
#CoronaPodcast 21: देशात आणि जगभरात काय घडलं?
#CoronaPodcast 21 : कोरोनासंदर्भात
आज (गुरुवार)
देशात आणि जगभरात काय घडलं, तसंच वाचकांचे कोरोनावर नेमके काय प्रश्न आहेत आणि
त्यांची उत्तरं काय आहेत, जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा विशेष कार्यक्रम कोरोना पॉडकास्ट.
महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू, 229 नवीन रुग्ण
आज राज्यात कोरोनाचे 229 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 1364 झाली आहे. आज राज्यात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या 25 मृत्यूंपैकी 14 पुण्यातील आहेत, तर मुंबईतील 9 जण आहे.
लॉकडाऊनच्या काटेकोर पालनासाठी SRPF ची मदत घेणार- राजेश टोपे
आता लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेण्यात येणार आहे, तसंच गर्दी होत आहे की नाही, यावर नजर ठेवली जाणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
नवजात बाळांना कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी
10 नवजात
बालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रोमानियामधील हॉस्टिपल प्रशासनाची चौकशी
करण्यात येत आहे.
हॉस्टिपटमधील स्टाफपैकी काही जणांना यापूर्वी कोरोनाची
लागण झाली होती. त्यामुळेच या बाळांना कोरोना झाल्याचं समजलं जात आहे.
रोमानियाचे आरोग्य मंत्री नेलू तातारू यांनी ही माहिती
दिली आहे. तसंच या बाळांपैकी एकाला त्याच्या आईसोबत घरी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
रोमानियात आतापर्यंत 5,000
व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 441
कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा गरोदर स्त्रियांना धोका किती, हे बीबीसी मराठीनं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी तुम्ही इथं वाचू शकता.
Getty ImagesCopyright: Getty Images
प्रातिनिधिक फोटोImage caption: प्रातिनिधिक फोटो
'हॉटस्पॉट' झोन नेमके काय असतात?
कोरोना विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही त्या त्या राज्यातल्या ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांना 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित केलं आहे.
दिल्ली सरकारने बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री शहरातील 20 भाग हॉटस्पॉट घोषित करून सील केले, तर उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये 104 भाग अतिसंवेदनशील म्हणजेच हॉटस्पॉट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
पण, हॉटस्पॉट जाहीर केलेल्या भागामध्ये नेमकी काय काळजी घेतली जाते? लॉकडाऊन आणि हॉटस्पॉटमध्ये नेमका फरक काय आहे? जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.
Getty ImagesCopyright: Getty Images
प्रातिनिधिक फोटोImage caption: प्रातिनिधिक फोटो
ओडिशात मास्कचा वापर अनिवार्य
महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनंतर ओडिशा सरकारनं
गुरुवारपासून मास्कचा वापरणं अनिवार्य केलं आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडल्यास 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तीनहून अधिक
वेळेस एखादी व्यक्ती मास्कशिवाय बाहेर आढळल्यास 500 रुपये
दंड मोजावा लागणार आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 549 नवीन रुग्ण, 17 जणांचा मृत्यू– आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य
मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या तसंच सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
1.आतापर्यंत
देशात कोरोनाचे 5734 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 549 रुग्ण आढळले असून 17
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 166 जणांचा मृत्यू झाला
आहे.
2. देशभरात पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा
पुरवठा सुरू करण्यात आलाय. 20 कंपन्या पीपीईचं उत्पादन करत आहेत,1.7 कोटी पीपीईची मागणी
करण्यात आली होती. याशिवाय 49 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली आहे.
3. मेडिकल स्टाफवर हल्ले होत आहेत, हे खरं आहे. आपण सगळ्यांनी मेडिकल स्टाफला सहकार्य करायला हवं.
4. पीपीईची कमतरता आहे, तर त्यामुळे घाबरायचं कारण नाही. सरकार पुरवठा करत आहे.
5. केंद्रानं कोव्हिड इमर्जन्सी पॅकेज मंजूर केलं आहे. याद्वारे केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल. यात आरोग्य सुविधा पुरवण्यात येईल.
ANICopyright: ANI
लव अग्रवालImage caption: लव अग्रवाल
महाराष्ट्रात आमदारांच्या पगारात होणार 30% कपात
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या
पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, राज्यातील सर्व विधिमंडळ
सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे
एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्यात येईल.
याव्यतिरिक्त
घेण्यात आलेले निर्णय -
1. आर्थिक
पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर
राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे.या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिली
समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त
विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल.
याशिवाय
दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब यांचा समावेश असेल.
2. ध्वजारोहण साधेपणाने करणार
1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण
हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या
उपस्थितीतच होईल.कुठलाही समारोह किंवा
परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
3. निवारा
केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविणे
कोरोना
संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक
करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन
यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत
मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याची देखील काटेकोर अंमलबजावणी
करण्याचा निर्णय घेण्यात आला.
'मरकजमध्ये सहभागी झालेले 58 ते 60 तबलिगी अजूनही लपून'
दिल्लीत निजामुद्दीन इथं जो कार्यक्रम झाला, त्याला कोणी परवानगी दिली? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
अनिल देशमुख यांनी म्हटलं, की निजामुद्दीन दिल्ली येथील तबलीगी मरकजमध्ये सहभागी झालेले लोक सर्व राज्यात विखुरल्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. महाराष्ट्रातही तबलिगीचे लोक सर्व जिल्ह्यात पसरले आहेत.
महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असताना तबलिगीमुळे अचानक हे संकट वाढलं. धारावीमध्ये सापडलेला पहिला रुग्णही तबलिगीशी संबंधित होता, असं देशमुख यांनी म्हटलं.
महाराष्ट्र सरकार या तबलिगींचा शोध घेत आहे. पण त्यातले 50 ते 60 जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वारंटाइनमध्ये भरती व्हावे , असे आवाहन त्यांनी केेलं आहे.
Video caption: कोरोनाचं संकट हे जर युद्ध आहे, तर या लढाईत डॉक्टर सैनिक आहेत.कोरोनाचं संकट हे जर युद्ध आहे, तर या लढाईत डॉक्टर सैनिक आहेत.
राज्य सरकारचे कोरोनासाठी संकेतस्थळ
"महाराष्ट्र सरकारच्या http://mahainfocorona.in
या संकेतस्थळाला भेट देऊन आपण कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळवू शकता.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
घरातच राहा... सुरक्षित राहा..."
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच का राहायचे हे सांगणारा एक व्हीडिओ मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्वांसाठी प्रसिद्ध केला आहे. पोलिसांना मदत करुन जनजीवन पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संबधित तरुण शाहूवाडी तालुक्यातील
उचत गावातील असून त्याचं वय 34 वर्ष आहे. तो दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता.
ओडिशाने वाढवला लॉकडाऊनचा काळ
ओडिशाने लॉकडाऊनचा काळ 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. असा निर्णय घेणारं ते पहिलंच राज्य आहे. ओडिशामधील शाळा 17 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
ताजे अपडेट्स
सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 94 हजार 745 इतकी आहे.
अधिक वाचाइथून पुढचे अपडेट्स पुढील पेजवर
गुरुवारचं हे LIVE पेज आता बंद करण्यात आलं आहे. वाचकांना आता पुढचे अपडेट्स शुक्रवारच्या लाईव्ह पेजवर मिळतील. त्यासाठी इथं क्लिक करा.
कोरोना व्हायरस : जगभरात आज काय घडलं?
1.जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांपेक्षा अधिक असल्याचं जॉन हॉपकिन्स विद्यापाठीच्या विश्लेषणातून समोर आलं आहे.
2.जगभरात कोरोना व्हायरसमुळे जवळपास 90 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
3.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील50 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले जाईल, असा इशारा ऑक्सफॅमनं दिला आहे.
4.अमेरिकेतल्या 66 लाख व्यक्तींनी बेरोजगारी भत्ता मिळावा म्हणून सरकारकडे स्वत:ची माहिती नोंदवली आहे.
5.देशातील कोरोना व्हायरसविषयक माहिती दडपल्याचा आरोप चीननं खोडून काढला आहे.
"चीन अत्यंत जबाबदारीनं आणि पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती जगापर्यंत पोहोचवत आहे," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिओ लिजान यांनी म्हटलं आहे.
#CoronaPodcast 21: देशात आणि जगभरात काय घडलं?
#CoronaPodcast 21 : कोरोनासंदर्भात आज (गुरुवार) देशात आणि जगभरात काय घडलं, तसंच वाचकांचे कोरोनावर नेमके काय प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं काय आहेत, जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा विशेष कार्यक्रम कोरोना पॉडकास्ट.
महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू, 229 नवीन रुग्ण
आज राज्यात कोरोनाचे 229 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 1364 झाली आहे. आज राज्यात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या 25 मृत्यूंपैकी 14 पुण्यातील आहेत, तर मुंबईतील 9 जण आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या 21 रुग्णांमध्ये (84%) मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशास्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील मृतांची संख्या आता 97 आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
लॉकडाऊनच्या काटेकोर पालनासाठी SRPF ची मदत घेणार- राजेश टोपे
आता लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेण्यात येणार आहे, तसंच गर्दी होत आहे की नाही, यावर नजर ठेवली जाणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
नवजात बाळांना कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी
10 नवजात बालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रोमानियामधील हॉस्टिपल प्रशासनाची चौकशी करण्यात येत आहे.
हॉस्टिपटमधील स्टाफपैकी काही जणांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच या बाळांना कोरोना झाल्याचं समजलं जात आहे.
रोमानियाचे आरोग्य मंत्री नेलू तातारू यांनी ही माहिती दिली आहे. तसंच या बाळांपैकी एकाला त्याच्या आईसोबत घरी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
रोमानियात आतापर्यंत 5,000 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 441 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा गरोदर स्त्रियांना धोका किती, हे बीबीसी मराठीनं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी तुम्ही इथं वाचू शकता.
'हॉटस्पॉट' झोन नेमके काय असतात?
कोरोना विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही त्या त्या राज्यातल्या ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांना 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित केलं आहे.
दिल्ली सरकारने बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री शहरातील 20 भाग हॉटस्पॉट घोषित करून सील केले, तर उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये 104 भाग अतिसंवेदनशील म्हणजेच हॉटस्पॉट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
पण, हॉटस्पॉट जाहीर केलेल्या भागामध्ये नेमकी काय काळजी घेतली जाते? लॉकडाऊन आणि हॉटस्पॉटमध्ये नेमका फरक काय आहे? जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.
ओडिशात मास्कचा वापर अनिवार्य
महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनंतर ओडिशा सरकारनं गुरुवारपासून मास्कचा वापरणं अनिवार्य केलं आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडल्यास 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तीनहून अधिक वेळेस एखादी व्यक्ती मास्कशिवाय बाहेर आढळल्यास 500 रुपये दंड मोजावा लागणार आहे.
स्पेनमध्ये 24 तासांत कोरोनाचे 5,756 नवीन रुग्ण
स्पेनमध्ये मृतांचा आकडा 15 हजारवर पोहोचला आहे, असं असलं तरी कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 5,756 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी (7 एप्रिल) ही संख्या 6,180 इतकी होती.
मंगळवारी आणि बुधवारी मात्र रुग्णांच्या संख्येत वाढझाली होती. त्यापूर्वीचे 4 दिवस रुग्णांची संख्या सतत घटत होती.
तसंच गुरुवारच्या आकडेवारीनुसार, मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही घट झाली आहे.
दरम्यान, स्पेनच्या संसदेत लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्यावर चर्चा सुरू आहे. पण, सध्या देशातील स्थिती नियंत्रणात असल्याचं पंतप्रधानांचं म्हणणं आहे.
मास्क लावल्यामुळे कोरोनापासून बचाव होतो?
कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क लावावा का? कोणता वापरावा? मास्क नसेल तर फडकं लावलं तर चालेल का? त्यामुळे शंभर टक्के संरक्षण मिळतं का?
या सगळ्या प्रश्नांची जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 549 नवीन रुग्ण, 17 जणांचा मृत्यू– आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या तसंच सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
1.आतापर्यंत देशात कोरोनाचे 5734 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 549 रुग्ण आढळले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 166 जणांचा मृत्यू झाला आहे.
2. देशभरात पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरू करण्यात आलाय. 20 कंपन्या पीपीईचं उत्पादन करत आहेत,1.7 कोटी पीपीईची मागणी करण्यात आली होती. याशिवाय 49 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली आहे.
3. मेडिकल स्टाफवर हल्ले होत आहेत, हे खरं आहे. आपण सगळ्यांनी मेडिकल स्टाफला सहकार्य करायला हवं.
4. पीपीईची कमतरता आहे, तर त्यामुळे घाबरायचं कारण नाही. सरकार पुरवठा करत आहे.
5. केंद्रानं कोव्हिड इमर्जन्सी पॅकेज मंजूर केलं आहे. याद्वारे केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल. यात आरोग्य सुविधा पुरवण्यात येईल.
महाराष्ट्रात आमदारांच्या पगारात होणार 30% कपात
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्यात येईल.
याव्यतिरिक्त घेण्यात आलेले निर्णय -
1. आर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे.या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल.
याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब यांचा समावेश असेल.
2. ध्वजारोहण साधेपणाने करणार
1 मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल.कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
3. निवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविणे
कोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
'मरकजमध्ये सहभागी झालेले 58 ते 60 तबलिगी अजूनही लपून'
दिल्लीत निजामुद्दीन इथं जो कार्यक्रम झाला, त्याला कोणी परवानगी दिली? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
अनिल देशमुख यांनी म्हटलं, की निजामुद्दीन दिल्ली येथील तबलीगी मरकजमध्ये सहभागी झालेले लोक सर्व राज्यात विखुरल्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. महाराष्ट्रातही तबलिगीचे लोक सर्व जिल्ह्यात पसरले आहेत.
महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असताना तबलिगीमुळे अचानक हे संकट वाढलं. धारावीमध्ये सापडलेला पहिला रुग्णही तबलिगीशी संबंधित होता, असं देशमुख यांनी म्हटलं.
महाराष्ट्र सरकार या तबलिगींचा शोध घेत आहे. पण त्यातले 50 ते 60 जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वारंटाइनमध्ये भरती व्हावे , असे आवाहन त्यांनी केेलं आहे.
जेव्हा डॉक्टर पेशंट होतात- पाहा व्हीडीओ
Video content
राज्य सरकारचे कोरोनासाठी संकेतस्थळ
"महाराष्ट्र सरकारच्या http://mahainfocorona.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपण कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळवू शकता. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा. घरातच राहा... सुरक्षित राहा..."
- बाळासाहेब थोरात, महसुलमंत्री
घरातच का राहायचे?
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच का राहायचे हे सांगणारा एक व्हीडिओ मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्वांसाठी प्रसिद्ध केला आहे. पोलिसांना मदत करुन जनजीवन पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
अजय देवगणने केले मुंबई पोलिसांचे कौतुक
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संबधित तरुण शाहूवाडी तालुक्यातील उचत गावातील असून त्याचं वय 34 वर्ष आहे. तो दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता.
ओडिशाने वाढवला लॉकडाऊनचा काळ
ओडिशाने लॉकडाऊनचा काळ 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. असा निर्णय घेणारं ते पहिलंच राज्य आहे. ओडिशामधील शाळा 17 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.