Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

ताजे अपडेट्स

सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार

 1. यापुढचे अपडेट्स पाहण्यासाठी...

  सुप्रभात.

  यापुढचे अपडेट्स तुम्ही या पानावर पाहू शकता

  इतर सर्व बातम्यांसाठी भेट द्या bbc.com/marathi

  फेसबुक- https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

  ट्विटर- https://twitter.com/bbcnewsmarathi

  युट्यूब - https://www.youtube.com/BBCNEWSMARATHI

  धन्यवाद.

  ववम
 2. 20 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सेवांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली :

  • अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट
  • 10टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
  • मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा

  मनरेगा

  • मनरेगाचीकामे सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू होणार
  • सिंचन आणि पाणी वाचवण्याच्या संबंधाबाबत कामे मनरेगामध्ये प्राधान्याने सुरू होणार

  खासगी क्षेत्र

  • इलेक्ट्रॉनिक मीडिया आणिDTH केबल सर्व्हिस
  • IT आणि त्यासंबंधित सेवा सुरू राहतील पण 50% कर्मचारी काम करणार
  • डेटा आणि कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू राहणार
  • ग्रामपंचायत स्तरावरील सरकारमान्य सेवा सुविधा केंद्र (common service center) सुरू राहणार
  • ई-कॉमर्स कंपनी
  • कुरियर सर्व्हिस

  इंडस्ट्री

  • घाऊक आणि वितरण सेवा (wholesale and distribution)
  • प्रतिबंध क्षेत्र वगळून Sez, industrial estate आणि industrial township मध्ये उत्पादन करणारे कारखाने सुरू होणार
  • कारखान्याच्या परिसरात कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी
  • कामाच्या ठिकाणी कर्मचारी येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळावे
  • प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणतीही व्यक्ती अशा ठिकाणी कामावर येऊ शकणार नाही
  • प्रतिबंधित क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील कारखाने
  • फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग,पॅकेजिंग आणि वाहतूक सेवा सुरू राहणार

  बांधकाम संबंधित काम(प्रतिबंधित क्षेत्र वगळून)

  • रस्ते, सिचन प्रकल्प, इमारत बांधकाम उद्योग संबंधित प्रकल्प
  • मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातबांधकाम कामांसाठी बाहेरून कामगार आणावे लागणार नाहीत अशा कामाबाबत आयुक्तांनी निर्णय घ्यावा
  • मान्सून पूर्व अत्यावश्यक कामे सुरू होणार
  • राज्य सरकारच्या कार्यलयात सचिव, सहसचिव ,उपसचिव यांनी आपल्या खात्यात 10% कर्मचाऱ्यांची उपस्थितीत काम करावे
 3. आफ्रिकन देशांना आवश्यक मदत करण्यास भारत तयार – नरेंद्र मोदी

  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आवश्यक मदत करण्यास भारत तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  दक्षिण आफ्रिका आफ्रिकन युनियनमध्ये कोरोना व्हायरसची साथ रोखण्याबाबत समन्वये साधत आहे. त्यांना मदत लागल्यास भारत पाठिंबा देईल.

  त्याचप्रकारे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांच्याशीही मोदींनी संवाद साधला व आवश्यक मदत करण्याचं आश्वासन दिलं.

  View more on twitter
 4. मालेगावात कोरोनाबाधित 14 नवे रुग्ण, एकूण संख्या 60वर

  नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मालेगाव महानगरपालिका हद्दीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आज(शुक्रवारी) 14 ने वाढली. त्यामुळे मालेगावातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 60वर गेला आहे.

  तर तीनजण कोव्हिड-19मुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 70वर पोहोचली आहे.

 5. धारावीत 25 हजार लोकांचं सर्वेक्षण, 25 कोरोना पॉझिटिव्ह तर 400 जण क्वारंटाईन

  धारावीत पाच हॉट स्पॉटमध्ये घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आलं. यावेळी 25 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यात 100 संशयितांची कोव्हिड-19 बाबत तपासणी करण्यात आली त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 400 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि धारावी प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली.

  धारावी परिसरातील मुकुंदनगर, मदिना नगर, सोशल नगर, कल्याणवाडी या हॉटस्पॉटमध्ये ही तपासणी करण्यात आली होती. यावेळी घरोघरी जाऊन लोकांना हात धुण्याचं महत्त्व, सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर याबाबत माहिती देण्यात आली.

 6. जगात साथ पसरत असतानाच भारताने उपाययोजना करायची होती - डॉ. अभय बंग

  जगात करोनाची साथ पसरत होती त्यावेळी परदेशातून भारतात आलेल्या ३० ते ४० लाख लोकांची चाचणी केली असती व त्यातील आवश्यक त्यांना लॉकडाऊन केले असते तर आज १३० कोटी भारतीयांवर लॉकडाऊन होण्याची वेळच आली नसती, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांनी केला आहे. .

 7. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची कोव्हिड-19 चाचणी

  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली. त्यांची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.

  कोरोना व्हायरसची लागण झाल्याबाबत तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट आंध्र प्रदेशला दक्षिण कोरियाकडून प्राप्त झाले.त्यानंतर हीचाचणी करण्यात आली.

  View more on twitter
 8. सोलापूरमध्ये एक कोरोनाग्रस्त वाढला, संख्या 13 वर

  सोलापूरमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये एकने वाढ झाली आहे. त्यामुळेसोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 13 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

  नव्याने सापडलेला रुग्ण सोलापुरातीलरविवारपेठ भागातील रहिवासी आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे, असं शंभरकर यांनी सांगितलं.

  View more on twitter
 9. कोरोनाच्या तडाख्यातून कोणाचीही सूटका नाही

  कोरोना
 10. कोव्हिड-19ची तपासणी आयसीएमआरच्या निकषांप्रमाणेच व्हावी, फडणवीस यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

  कोव्हिड-19ची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिका इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल (आयसीएमआर)च्या निकषांऐवजी वेगळे निकष वापरत आहे. ही तपासणी करताना निकषात केलेल्या बदलांमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कृत्रिम घट दिसून येईल. पण प्रत्यक्षात धोका वाढेल. त्यामुळे आयसीएमआरच्या सूचनांचं पालन करण्यात यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

  View more on twitter
 11. धारावीत रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली

  धारावीत रुग्णांच्या संख्येनं 100 चा आकडा पार केला आहे.

  आज 15 नवीन रुग्ण आढळले, तर एक जणाचा मृत्यू झाला आहे.

  धारावीत आतापर्यंत 101 रुग्ण आणि 10 मृत्यूंची नोंद झालीय.

 12. उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, मिलिंद पाटील यांच्यावर कारवाई करण्याची किरीट सोमय्यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

  कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णाचं नाव सार्वजनिक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. काही न्युज चॅनेलनी कोरोनाबाधित रुग्णांची नावं जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देशमुख यांनी दिले होते. त्याच प्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मंत्री आव्हाड आणि नेते पाटील यांच्यावर कारवाई करावी, असं सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

  View more on twitter
 13. टेस्टिंग कमी करण्याचं BMC चं पत्रक बिनडोकपणाचं - आशिष शेलार

  भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :

  • मुंबई शहरातील 10 टक्के भागात सुद्धा महापालिकेनं निर्जंतुकीकरण केलं नाही
  • मुलुंड-भांडुपचा अनुभव पाहता शिजवलेलं अन्न सुद्धा महापालिका पोहोचवत नाही
  • मुंबईतील खासगी हॉस्पिटल बंद पडण्याची अवस्था निर्माण झालीय
  • 26 जुलैच्या पावसावेळी मुंबईकर हताश होते, तसे मुंबईकर आता हताश आहेत
  • 26 जुलैवेळी मुंबईकरांनी जीव वाचवण्यासाठी तडफड केली, तशी आता करतायत
  • जे भाग कोरोनाबाधित नाहीत, त्या भागात केंद्राच्या नियमांनुसार उद्योग सुरू व्हावेत
  • टेस्टिंग कमी करण्याचं BMC चं पत्रक बिनडोकपणाचं, हे पत्रक मागे घ्यावं
 14. आशिष शेलार यांचा फेसबूकद्वारे संवाद

  आमदार आशिष शेलार फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

  View more on facebook
 15. अमेरिकेत आशियाई वंशाच्या लोकांना अंत्यसंस्कार करणंही जातंय कठीण

  पाहा व्हीडिओ

  Video content

  Video caption: कोरोना व्हायरस : अमेरिकेत आशियाई वंशाच्या लोकांना अंत्यसंस्कार करणंही जातंय कठीण
 16. लव अगरवाल यांच्या पत्रकार परिषदेतील इतर महत्त्वाचे मुद्दे

  देशातील चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.

  इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूचं प्रमाण किंचित कमी आहे.

  हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत

  कोरोना व्हायर्सग्रस्तांच्या जास्त प्रमाण असलेल्या राज्यामध्ये 5 लाख रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट वितरित करण्यात येणार आहेत.

  औषध, लसीकरण यांच्यासारख्या विषयांवर भारत जगातील इतर संस्थांसोबत मिळून युद्धपातळीवर काम करत आहे.

 17. देशातील कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या 13387वर, वाढीच्या प्रमाणात घट

  देशात काल एका दिवसात कोरोना व्हायरसची लागण झालेले 1007 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 13387 वर पोहोचली आहे. पण वाढीच्या प्रमाणात 40 टक्क्यांची घट झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  देशात आतापर्यंत 1749 लोक बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 13.06 % आहे.

  गेल्या 24 तासात 23 मृत्यूंची नोंद झाली आहे.

  लॉकडाउन पूर्वी देशातील रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण 3 दिवस होतं. तर गेल्या 7 दिवसांपासूनची आकडेवारी पाहिल्यास हे प्रमाण 6.2 दिवस इतकं आहे. देशातील 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डबलिंग रेट कमी आहे. देशात डलिंग रेटचं प्रमाण आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न. सुरू आहेक, एकूण रुग्ण वाढीच्या प्रमाणात 40 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती अगरवाल यांनी दिली.

 18. रेशन धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी – अजित पवार

  कोरोना व्हायरसच्या संकटकाळात गोरगरीबांना रेशन दुकानांतून मिळणाऱ्या धान्यवाटपाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धान्यवाटप सुरळीत,विनातक्रार होण्यासह त्यात गैरप्रकार होऊ नयेत,याबाबतच्या तक्रारींच्या तत्काळ निराकरणासाठी पालकमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

  View more on twitter