2.राज्यात गेल्या 24 तासांत 811 रुग्ण वाढले, एकूण
रुग्णांची संख्या 7628 वर
3. विलगीकरणासाठी खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण
करावे - अजित पवार
4.स्थलांतरित मजूरांना गावी जायचं आहे, त्यांच्या मागणीचा विचार सुरू – राजेश टोपे
5.40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्यात एक
लाखांवर चाचण्या
6. बरे झालेल्या रुग्णांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता - WHO
Getty ImagesCopyright: Getty Images
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
कोरोना व्हायरसच्या
उद्रेकामुळे बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही
बंद आहे. यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने
प्रयत्न सुरू केले आहेत.
आज केंद्रीय सचिव राजीव
गौबा यांनी विविध राज्यातील मुख्य सचिवांशी चर्चा केली. राज्यांकडून अहवाल
मागवण्यात आला आहे. त्यानंतर भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
कोरोना व्हायरसला
रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असताना भारतीय सैन्याने रोहतांग पासजवळच्या
रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने
दिली आहे.
ANICopyright: ANI
ब्रेकिंगराज्यात गेल्या 24 तासांत 811 रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 7628 वर
महाराष्ट्रात ज्यात गेल्या
24 तासांत 811 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 7628 वर गेली आहे. तर
आजपर्यंत राज्यात 323 जण कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती
राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासांत 22
जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत 1076 कोरोनाग्रस्त
रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची
संख्या 5 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईतील 5049 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पाठोपाठ
पुण्यामध्ये 1030 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आतापर्यंत आढळून आलेलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे
मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची स्पेनमधली संख्या वाढून 22 हजार 902 झाली आहे.
गेल्या 24 तासात 378 जण
मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत ही संख्या इतकी जास्त
नाही. शुक्रवारी स्पेनमध्ये 367 जणांचा मृत्यू झाला होता. ही मागच्या एका
महिन्यातील मृत्यूंची सर्वात कमी संख्या होती.
रशियात 66 जणांचा गेल्या
24 तासांत मृत्यू झाला. त्यामुळे इथली मृतांची संख्या वाढून 681 वर गेली आहे.
रशियामध्ये सुमारे 75 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
जर्मनीत दुसऱ्या दिवशी नवे
रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट दिसून आली. तिथं आतापर्यंत 5500 जणांचा मृत्यू
झाला असून दीड़ लाखांहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
ईराणमध्ये कोरोना
व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5650 झाली आहे. गेल्या 24 तासांत 67
जणांचा मृत्यू झाला. इथं आतापर्यंत 90 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दिल्लीत 95 कंटेनमेंट झोन
कोरोना व्हायरसच्या
प्रादुर्भावामुळे दिल्लीत करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनची संख्या 95 झाली आहे,
अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.
सोलापुरात कोरोना
व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या आज 9ने वाढली. त्यामुळे सोलापुरातील
कोरोनाग्रस्तांची संख्या 50वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
यांनी दिली.
एकूण रुग्णांपैकी 4 जणांचा
मृत्यू झालेला असून उर्वरित 46 जणांवर उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशात कोरोना
व्हायरसची लागण झालेले आतापर्यंत 1945 रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत 99 जणांचा
कोव्हिड-19मुळे मृत्यू झाला आहे.
इंदूरमध्ये 1085 रुग्ण
आढळले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भोपाळमध्ये 388 रुग्ण आढळले असून
त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिली
आहे.
40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्यात एक लाखांवर चाचण्या
राज्यात गेल्या सुमारे दीड
महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत 40 प्रयोगशाळांच्या
माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या
महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना
आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत
आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले. काल दि. 24 एप्रिल पर्यंत राज्यात 1 लाख 2 हजार 189 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने
करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले. राज्यात आजमितीस शासकीय
आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज पाच
ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या
रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या पोलीसाचा मृत्यू
कोरोनाची लागण झालेल्या 57 वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे - अजित पवार
शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचेआदेश दिले होते.आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.
पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोव्हिड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती जाणून घेतली.
या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे,त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल,असे सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?
Video content
Video caption: जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?
केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू
केशरी कार्डधारकांना रेशन
धान्याचं वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ताजे अपडेट्स
सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 94 हजार 745 इतकी आहे.
अधिक वाचाकोरोना व्हायरस टाळायचा असेल तर 'हे' करा आणि सुरक्षित राहा
सावर्जनिक ठिकाणी वावरताना, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना मास्कचा वापर करणं आता अनिवार्य आहे.
अधिक वाचा'कोरोनाचं एकच औषध आपल्याला माहिती आहे... ते म्हणजे...'
'....जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत याच औषधाने हा आजार रोखू शकतो.'
अधिक वाचाएक नजर आजच्या मुख्य घडामोडींवर
आजचं लाईव्ह कव्हरेज थांबवत आहोत.
जाता जाता एक नजर आजच्या मुख्य घडामोडींवर...
1.भारतात कोरोनाचे 24 हजार 942 रुग्ण
2.राज्यात गेल्या 24 तासांत 811 रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 7628 वर
3. विलगीकरणासाठी खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे - अजित पवार
4.स्थलांतरित मजूरांना गावी जायचं आहे, त्यांच्या मागणीचा विचार सुरू – राजेश टोपे
5.40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्यात एक लाखांवर चाचण्या
6. बरे झालेल्या रुग्णांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता - WHO
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद आहे. यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
आज केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यातील मुख्य सचिवांशी चर्चा केली. राज्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
'कोरोनामुळे देशातील 40 कोटी कामगार झाले बेरोजगार'
लॉकडाऊनदरम्यान सैन्याकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असताना भारतीय सैन्याने रोहतांग पासजवळच्या रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
ब्रेकिंगराज्यात गेल्या 24 तासांत 811 रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 7628 वर
महाराष्ट्रात ज्यात गेल्या 24 तासांत 811 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 7628 वर गेली आहे. तर आजपर्यंत राज्यात 323 जण कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत 1076 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारांच्या वर गेली आहे. मुंबईतील 5049 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पाठोपाठ पुण्यामध्ये 1030 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आतापर्यंत आढळून आलेलं आहे.
तीन आठवड्यांच्या तान्हुलीने कोरोनावर केली मात
सुरुवातीच्या दोन-तीन आठवड्यांमध्येच बाळाला अंघोळ घालताना थोडी लक्षणं दिसत होती. मात्र, ही लक्षणं अगदीच सौम्य होती.
अधिक वाचास्पेनमधील मृतांच्या संख्येतील घट कायम
कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची स्पेनमधली संख्या वाढून 22 हजार 902 झाली आहे.
गेल्या 24 तासात 378 जण मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत ही संख्या इतकी जास्त नाही. शुक्रवारी स्पेनमध्ये 367 जणांचा मृत्यू झाला होता. ही मागच्या एका महिन्यातील मृत्यूंची सर्वात कमी संख्या होती.
रशियात 66 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला. त्यामुळे इथली मृतांची संख्या वाढून 681 वर गेली आहे. रशियामध्ये सुमारे 75 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
जर्मनीत दुसऱ्या दिवशी नवे रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट दिसून आली. तिथं आतापर्यंत 5500 जणांचा मृत्यू झाला असून दीड़ लाखांहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
ईराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5650 झाली आहे. गेल्या 24 तासांत 67 जणांचा मृत्यू झाला. इथं आतापर्यंत 90 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दिल्लीत 95 कंटेनमेंट झोन
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दिल्लीत करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनची संख्या 95 झाली आहे, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.
देशात काही भागांमधील दुकानं उघडण्याची केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली परवानगी. पण आपल्या शहरात कोणती दुकानं उघडणार आणि कोणती राहाणार बंद?
ब्रेकिंगसोलापुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50वर
सोलापुरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या आज 9ने वाढली. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 50वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
एकूण रुग्णांपैकी 4 जणांचा मृत्यू झालेला असून उर्वरित 46 जणांवर उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1945वर
मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झालेले आतापर्यंत 1945 रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत 99 जणांचा कोव्हिड-19मुळे मृत्यू झाला आहे.
इंदूरमध्ये 1085 रुग्ण आढळले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भोपाळमध्ये 388 रुग्ण आढळले असून त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्यात एक लाखांवर चाचण्या
राज्यात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले. काल दि. 24 एप्रिल पर्यंत राज्यात 1 लाख 2 हजार 189 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले. राज्यात आजमितीस शासकीय आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या पोलीसाचा मृत्यू
कोरोनाची लागण झालेल्या 57 वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंगभारतात कोरोनाचे 24 हजार 942 रुग्ण
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 24 हजार 942 वर गेली आहे. आतापर्यंत 779 लोकांचा मृत्यू झाला आहे.
खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे - अजित पवार
शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचेआदेश दिले होते.आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.
पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोव्हिड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती जाणून घेतली.
या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे,त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल,असे सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?
Video content
केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू
केशरी कार्डधारकांना रेशन धान्याचं वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.