Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

ताजे अपडेट्स

सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार

 1. आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा

  नमस्कार मंडळी,

  बीबीसी मराठीचं कोरोना व्हायरसबाबतचं आजचं लाईव्ह कव्हरेज इथेच थांबवत आहोत.

  जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर -

  • लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार - निर्मला सीतारामन
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठवा, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी
  • आज राज्यात 1495 नवे कोरोनाग्रस्त, तर 54 रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 25922 वर
  • गावांतील ग्रामसभांना तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
  • कोरोना व्हायरसची लस लोकांपर्यंत पोहोचण्यास लागू शकतात अडीच वर्षं- WHO

  कोरोना व्हायरससंदर्भात प्रत्येक अपडेटसाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला उद्या पुन्हा भेट द्या.

  शुभरात्री, धन्यवाद.

  कोरोना
 2. नागपुरात उभारण्यात आलं 5 हजार खाटांचं कोव्हिड-19 केअर सेंटर

  नागपूरमध्ये कळमेश्वर रस्त्यावर राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या आश्रमात कोव्हिड-19 केअर सेंटरची उभारणी केली आहे. इतक्या मोठ्या स्वरूपातलं हे पहिलंच कोव्हिड केअर सेंटर असण्याची शक्यता आहे. अशी माहिती महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.

  View more on twitter
 3. #CoronaPodcast : कोरोना व्हायरसबाबत आज काय काय घडलं?

  #CoronaPodcast : आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या पॅकेजमधून कोणाला काय मिळणार? कोरोनाची लस यायला अजून लागू शकतात अडीच वर्षं, WHO चं काय म्हणणं आहे? पोलिसांवरील भार कमी करायला महाराष्ट्रात येणार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० तुकड्या. याबाबत सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड

  View more on facebook
 4. आज राज्यात 1495 नवे कोरोनाग्रस्त, तर 54 रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 25922 वर

  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेले तब्बल 1495 नवे रुग्ण बुधवारी आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25922 वर पोहोचली आहे.

  एकूण 54 कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 975 वर पोहोचली आहे.

  तसंच आज राज्यात 422 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत महाराष्ट्रात कोव्हिड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 5547 इतकी आहे.

  कोरोना
 5. नितीन श्रीवास्तव

  बीबीसी प्रतिनिधी

  लस

  कोरोना व्हायरसवरची लस लोकांपर्यंत पोहोचायला अडीच वर्षांपर्यंतचा काळ लागण्याचा अंदाज WHOचे डेव्हिड नबारो यांनी व्यक्त केला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. सिंगापूरमध्ये वैमानिकाने क्वारंटाईनचा नियम तोडल्याबद्दल तुरूंगवासाची शिक्षा

  सिंगापूरमध्ये एका अमेरिकन वैमानिकाने क्वारंटाईनचा नियम तोडल्याबद्दल त्याला एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

  पार्स आणि कुरिअर कंपनी फेडेक्सचं विमान घेऊन 44 वर्षीय पायलट एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाहून सिंगापूरमध्ये दाखल झाला होता.

  त्याला एअरपोर्टवरच हॉटेलमध्ये राहण्याचा आदेश देण्यात आला होता. पण तो रेल्वेने शहरातील बाजारपेठेच्या भागात दुकानांमध्ये गेला.

  सिंगापूरमध्ये आतापर्यंत 25 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले असून इथं 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  फेडेक्स
 7. लंडनमध्ये लॉकडाऊन शिथील करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

  इंग्लंडमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच खूप सारे लोक कामावर परतले. पण मेट्रो प्रवासादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं अशक्य असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

  तसंच फक्त 10 टक्के लोकांनीच मास्क घातला होता, असं स्थानिक पोलीस कर्मचारी मॅट हिक्सन यांनी बीबीसीला सांगितलं.

  यामुळे संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होऊ शकतो, असा इशारा रेल्वे संघटनेनं दिला आहे.

  मेट्रो
 8. क्वारंटाइन

  भारतामध्ये 25 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे आणि सगळ्याच राज्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. श्रमिक रेल्वे तिकिटाच्या शुल्कासाठी 54 कोटी 75 लाख रुपये देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

  महाराष्ट्रासह इतर राज्यांत अडकलेल्या कामगार, मजुरांची ने-आण करण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांना 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 इतका निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

  View more on twitter
 10. गावांतील ग्रामसभांना तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

  राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

  View more on twitter
 11. देशात 13 मेपर्यंत 642 श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या

  देशात 13 मेपर्यंत भारतीय रेल्वेकडून आतापर्यंत 642 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या रेल्वेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 लाख 90 हजार प्रवासी त्यांच्या घरी गेल्याचं सरकारने कळवलं आहे.

  रेल्वे
 12. A man measuring his waist

  एका अभ्यासानुसार स्थूल असणाऱ्या व्यक्तींना कोव्हिड-19 चा धोका अधिक आहे आणि स्थूलतेशी संबंधित इतर आजार असतील जसं की हृदयविकार किंवा डायबिटीस तर धोका अनेकपटींनी वाढतो.

  अधिक वाचा
  next
 13. टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात.
  • ही कपात मार्च 2021 पर्यंत लागू.
  • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली.
  • टॅक्स ऑडिटची मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवली
 14. वीज कंपन्यांना 90 हजार कोटींची मदत - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • वीजबिल आकारणी थांबल्यामुळे वीज कंपन्यांचं नुकसान होतं आहे.
  • त्यासाठी सरकार 90000 कोटी रुपयांची मदत करणार.
  • बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न
  • नोंदणी आणि पूर्णत्वाचा दाखला सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवण्याचा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
 15. जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्रसरकार भरणार - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्रसरकार भरणार
  • 2500 कोटी रुपयांची रोखता, लवचिकता यातून येणार.
  • 3 लाख 66 हजार संस्थांना याचा फायदा मिळणार.
  • कोव्हिड-19 नंतर उद्योजकांचा माल खपावा यासाठी ट्रेड फेअर शक्य होणार नाहीत. अशावेळी ई-फेअरची सोय करून देणार
  • ज्यांना आधी लिहिलेला लाभ मिळणार नाही, अशांसाठी आता EPF चा हप्ता 12 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  • यातून लोकांकडे जास्त पैसे खेळतील. सरकारी कर्मचाऱ्यांना ही सूट नाही. ते 12 टक्के EPF हप्ताच भरतील.
  • वित्तसंस्थांसाठी 30 हजार कोटींची रोखता योजना, या संस्थांचे इन्व्हेस्टमेंट डेब्ट पेपर्स सरकार विकत घेणार
 16. 200 कोटींपेक्षा कमीची टेंडर ही स्थानिक उद्योगांना मिळणार - अनुराग ठाकूर

  अनुराग ठाकूर यांच्या भाषणातील मुद्दे -

  • यापुढे 200 कोटींपेक्षा कमीची टेंडर ही स्थानिक उद्योगांना मिळणार
  • स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 17. अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • मध्यम आणि सूक्ष्म आकाराच्या आणि अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी तयार करणार.
  • 45 लाख उद्योजकांना याचा फायदा होईल.
  • लघु, कुटिर उद्योगांना दिलं जाणारं कर्ज 4 वर्षं मुदतीचं.
  • कर्जासाठी तारण आवश्यक नाही.
  • पहिले 12 महिने कर्जाचा हप्ता स्थगित.
  • सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांची व्याख्या बदलली
  • सूक्ष्म उद्योग - 1 कोटींपर्यंतची गुंतवणूक
  • लघु उद्योग - 5 कोटींची गुंतवणूक आणि 10 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्या
  • मध्यम आकाराचे उद्योग - 10 कोटींची गुंतवणूक आणि 20 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्या
 18. कुटीर आणि लघु द्योगांसाठी 6 नव्या योजना आणणार - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • स्थानिक ब्रँड्सना जागतिक बनवण्याचं लक्ष्य
  • कोरोनाच्या काळातही देशासमोर संधी असल्याचं पंतप्रधान मानतात.
  • आवास, आणि उज्ज्वला योजनांतून गरिबांना फायदा होत आहे.
  • 18000 कोटी रुपयांचा आयकर परतावा करदात्यांना आतापर्यंत दिला.
  • 14 कोटी मध्यमवर्गीयांना त्यातून फायदा मिळाला.
  • कुटीर आणि लघु द्योगांसाठी 6 नव्या योजना आणणार.
  • MSME कंपन्यांसाठी करमाफीसाठी 25 कोटी रुपये,
  • 12 महिन्यांचा करहप्ता स्थगित करण्याची सोय,
  • लघु आणि कुटिर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना
 19. आत्मनिर्भर भारत जगापासून विलग होऊन आत्ममग्न होणार नाही - निर्मला सीतारामन

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • आत्मनिर्भर भारत जगापासून विलग होऊन आत्ममग्न होणार नाही.
  • भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी आणि विकासाची गती वाढवण्यासाठी पॅकेजची घोषणा करत आहे.
  • गरिबांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवले. बँकमित्रांनी गरिबांना घरपोच पोहोचवले.
  • चांगल्या जीवनासाठी सुधारणा आवश्यक
 20. निर्मला सीतारमन

  'आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 10 टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

  अधिक वाचा
  next