Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

ताजे अपडेट्स

सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार

 1. आज दिवसभरात काय घडलं?

  महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येनं आज 30 हजाराचा आकडा पार केला, तर केंद्रीय अर्थमंत्रालयानं कोळसा, हवाई वाहतूक, संरक्षण अशा विविध क्षेत्रात आज सुधारणेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घोषणा केल्या.

  आज दिवसभरात अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मात्र, आजचे अपडेट इथे थांबवण्याआधी आज काय घडलं, यावर एक नजर टाकू.

  • महाराष्ट्रात आज 1606 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 30706 एवढी झालीय.
  • महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत 1,49,798 मजुरांना एसटीच्या माध्यमातून राज्याच्या सीमेवर सोडलं
  • वानखेडे स्टेडियममध्ये आता क्वारंटीन केंद्र असणार आहे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्टेडियमची पाहणी केली.
  • देशभरात गेल्या 24 तासात, कोरोनाचे 3970 नवीन रुग्ण आढळले असून, 103 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • भारतातील संरक्षण क्षेत्रातली FDI ची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवली
  • कोळसा उत्पादन क्षेत्रात सरकार 50,000 कोटी गुंतवणार - निर्मला सीतारमण
  • आतापर्यंत 14 लाख लोकांना रेल्वेनं घरी पोहोचवलं - रेल्वे मंत्रालयाची माहिती
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजवर टीका केली आहे.
  • उत्तर प्रदेशात औरेया इथं स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • वर्ल्ड बँकेकडून भारतासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष पॅकेज
  • कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये मृतांची संख्या 34,078 झालीय.

  आता आपण उद्या बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर नव्या अपडेट्ससह भेटू. धन्यावद...!

 2. Video content

  Video caption: कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'

  रमजानचा महिना सुरू आहे. पण हा रमजान दरवर्षीपेक्षा वेगळा आहे.

 3. महाराष्ट्रात आज कोरोनाची काय स्थिती?

  • महाराष्ट्रात आज 1606 नवे रुग्ण आढळले.
  • महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 30706 एवढी झालीय.
  • एकूण 67 जणांचा आज महाराष्ट्रात मृत्यू झाला.
  • आज एकूण 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 7088 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
  • मुंबईतल्या रुग्णांची एकूण संख्या 18555 एवढी झालीय.
  View more on twitter
 4. औरैया दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत

  उत्तर प्रदेशातील औरैया दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. ही मदत पंतप्रधान मदतनिधीतून दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यलयानं याबाबत माहिती दली.

  View more on twitter
 5. मुंबईत आज 884 नवे रुग्ण आढळले

  मुंबईत आज कोरोनाचे 884 नवे रुग्ण आढळले, तर 41 जणांचा मृत्यू झाला.

  एकट्या मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 18 हजार 396 वर पोहोचलीय.

  View more on twitter
 6. आतापर्यंत 1,49,798 मजुरांना एसटीच्या माध्यमातून राज्याच्या सीमेवर सोडलं

  लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या 1,49,798 परप्रांतीय मजुरांना एसटीच्या 11 हजार 379 बसने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड आणि कर्नाटकच्या सीमेवर सोडण्यात आलं.

  View more on twitter
 7. ब्रिटनमध्ये कोरोनामुळं मृतांची संख्या 34 हजाराहून अधिक

  कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये मृतांची संख्या 34,078 झालीय.

  • इंग्लंडमध्ये आज 181 जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची एकूण संख्या 24,527 झाली
  • स्कॉटलंडमध्ये आज 41 जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची एकूण संख्या 2,094 झाली
  • वेल्समध्ये 1191, तर नॉर्दर्न आयर्लंडमध्ये 473 जणांचा मृत्यू झालाय.
 8. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या घोषणांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

  कोळसा, संरक्षण, हवाई वाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सुधारणांविषयी केंद्रीय अर्थमंत्रालयानं केलेल्या घोषणांनी भारतात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

  View more on twitter
 9. वानखेडे स्टेडियमची मुंबईच्या महापौरांकडून पाहणी

  किशोरी पेडणेकर

  आगामी पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यातील नियोजनाच्या दृष्टिकोनातून जागेची उपलब्धता असावी या अनुषंगाने मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली. यावेळी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले हेही सोबत होते.

  वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे रचना करण्यात येईल याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच स्टेडियमच्या आतमध्ये आणि बाहेर कितीशौचालये असावीत, याची नियोजनात्मक चर्चा करण्यात आली.

  महापालिकेच्या ए विभागाच्या वतीने वानखेडेच्या प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

  View more on twitter
 10. मुंबईतील धारावीत आज 53 नवे रुग्ण आढळले

  मुंबईतील धारावीत आज 53 नवे रुग्ण आढळले. दादर, माहिम आणि धारावीत आज कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही.

  धारावीतल्या एकूण रुग्णांची संख्या 1198 झालीय.

  View more on twitter
 11. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  कोरोना व्हायरस

  कोरोना व्हायरसमुळे एकीकडे घरी बसल्याने अस्वस्थता वाढलीय, तर दुसरीकडे आपल्याला काही करता येईल का, असा प्रश्नही आता अनेकांच्या मनात येतोय.

  अधिक वाचा
  next
 12. मुंबईतील शाहूनगरचे API अमोल कुलकर्णी यांचा कोव्हिडमुळे मृत्यू

  अनिल देशमुख

  मुंबईतील शाहूनगरचे API अमोल कुलकर्णी यांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत पोलीस स्टेशनला भेट दिली आणि पोलिसांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

  “राज्य पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोव्हिडमुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. सरकारकडून 50 लाख रूपये, विम्याचे पाच लाख आणि पोलीस वेल्फेअर फंडातून 10 लाख मदत दिली जाईल. तसंच, कुटुंबातील एकाला नोकरीही दिली जाईल,” अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली.

  View more on twitter
 13. राहुल गांधी यांनी दिल्लीत स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला

  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. सुखदेव विहार उड्डाणपुलाजवळ फूटपाथवर बसलेल्या मजुरांशी राहुल गांधींनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  View more on twitter
 14. मॅडम, लोकांना पैसा हवाय, आकडे नकोत - मनिष तिवारी

  काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सुधारणेसाठी केलेल्या घोषणांवर टीका केलीय. तिवारी म्हणाले, "मॅडम लोकांना पैसे हवेत. डीसीटी - डायरेक्ट कॅश ट्रान्सफर. रोजच्या आकड्यांच्या घोषणा नकोत."

  View more on twitter
 15. दिल्ली हायकोर्टाचं कामकाज 23 मेपर्यंत बंदच

  दिल्ली हायकोर्ट आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व न्यायालयांचं कामकाज 23 मेपर्यंत बंदच राहील, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

  View more on twitter
 16. VIDEO - लॉकडाऊन 4 मध्ये प्रवेश करतांना भारताने जगाकडून काय शिकावं?

  View more on twitter
 17. RAF च्या जवानांना पुणेकरांचा सलाम

  पुणे शहरात लॉकडाऊनचं काटेकोर पालन व्हावं यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सनं फ्लॅग मार्च केला. त्यावेळी नागरिकांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा देत टाळ्या वाजवल्या.

  View more on twitter
 18. 'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारलं असतं'

  बंद खोलीत दररोज सतत कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आपल्याला लॉकडाऊनने दिली. कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी कुटुंब म्हणून सगळे एकत्र राहत आहोत. पण विचार करा त्या आजी-आजोबांचा, जे अशा अभूतपूर्व संकटाच्या काळातही कुटुंबापासून दूर वृद्धाश्रमात राहतायत.

  वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसंबंधी संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 19. भारतातील संरक्षण क्षेत्रातली FDI ची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवली

  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी मेक इन इंडियाला बळ देणं आवश्यक
  • शस्त्राचं उत्पादन भारतात व्हावं, हे ध्येय आहे
  • काही शस्त्रांच्या आयातीवर बंदी आणली जाईल
  • संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय
  • संरक्षण क्षेत्रातली परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांवर नेण्यात येईल
  • भारतातील एअर स्पेस वाढवणार, सध्या केवळ 60 टक्के एअर स्पेसचाच हवाई वाहतुकीसाठी वापर होतोय
  • एअर स्पेस वाढवल्यानं एक हजार कोटी रुपये वाचतील
  • PPP मॉडेलद्वारे भारतातील सहा विमानतळांचा विकास करणार
  View more on twitter
 20. कोळसा क्षेत्रात आता खासगी कंपन्यांनाही संधी

  सलग चौथ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्रालयाची पत्रकार परिषद असून, वीस लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकजची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण गेल्या तीन दिवसांपासून देत आहेत.

  • आत्मनिर्भर भारत म्हणजेच मेक इन इंडियाच्या ध्येयाला आणखी मजबूत करणं होय
  • आपल्याला स्पर्धेसाठी तयार झाले पाहिजे
  • इज ऑफ डूईंगसाठी वातावरण तयार केलं जातंय
  • गुंतवणूक आणयाची आहे, रोजगारही वाढवायचा आहे
  • आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे भारताला सक्षम बनवायचंय
  • देशात उत्पादन, देशासाठी उत्पादन
  • राज्यातील गुंतवणूक आकर्षण क्षमता किती आहे, यावरून रँकिंग ठरवणार
  निर्मला सीतारमण
  • कोळशावरची सरकारची मक्तेदारी दूर केली जाईल - सीतारमण
  • कोळशासाठी कमर्शियल मायनिंगचं धोरण आणलं जाईल - सीतारमण
  • कोळशापासून गॅस बनवणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल - सीतारमण
  • कोळसा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश, खाणीतून कोळसा खरेदी करून बाजारात विकू शकतात
  • कोळसा खाणी ते रेल्वे या जोडणीसाठी 18 जार कोटींची गुंतवणूक केली जाईल
  • कोळशाच्या छोट्या छोट्या खाणींचा लिलाव केला जाईल