Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

ताजे अपडेट्स

सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार

 1. कोरोना

  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 94 हजार 745 इतकी आहे.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: 'सध्याच्या परिस्थितीत लोक स्वस्त आणि टिकाऊ असणारं चीज घेणं पसंत करतायत.'

  दक्षिण युरोपमधील फ्रान्स, स्पेन आणि इटली या देशाच्या रेस्टॉरंट्समध्ये माशांना भरपूर मागणी असते, ही ताज्या माशांची मागणी चक्क शून्यावर आली आहे.

 3. क्रिस मॉरिस आणि अँथनी रुबेन

  बीबीसी रिएलिटी चेक

  लीड

  वेगवेगळं वातावरण, भौगोलिक परिस्थिती, आरोग्य व्यवस्था असलेल्या विविध देशांमध्ये एकाच रोगाबाबतची अशी तुलना करावी का?

  अधिक वाचा
  next
 4. लॉकडाऊन

  रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये सलून सुरू राहील, असं महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलंय.

  अधिक वाचा
  next
 5. आज दिवसभरात काय घडलं?

  कोरोना व्हायरसबाबत आज दिवसभरातील अपडेट आपण इथे पाहिले. आजचे अपडेट आपण इथेच थांबवतोय.

  उद्या नवीन बातम्यांसह भेटू आणि नवीन अपडेट जाणून घेऊ. मात्र, तुम्हाला गुड नाईट म्हणण्याआधी आज दिवसभरात काय काय घडलं, याचा एक धावता आढावा घेऊया :

  • महाराष्ट्रात आज 2100 नवे रुग्ण आढळले. त्यामुळं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली आहे.
  • राज्य सरकारकडून चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी
  • मुंबईतील ‘बेस्ट’च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण, लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 137 वर पोहोचली
  • पदवीची म्हणजेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा यावर्षी रद्द करण्यात यावी आणि गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल लावता येईल का? अशी विचारणा महाराष्ट सरकारनं विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच UGC ला केलीय.
  • मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर आजही अनेक स्थलांतरित मजूर गोळा झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गर्दी कमी होण्यास मदत झाली.
  • देशात कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर, कोरोनाची जन्मभूमी चीनलाही मागे टाकलं
  • 1 जून 2020 पासून दिवसाला 200 ट्रेन धावतील, अशी माहिती भारतीय रेल्वेनं ट्विटरवरून दिलीय. या ट्रेन वातानुकूलित नसतील. शिवाय, द्वितीय श्रेणी कोचच्या या ट्रेन असतील. अडकलेल्या मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त 200 ट्रेन असतील, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट सांगितलंय.
  • स्विगी कंपनीने 1,100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, जगभरात उबरमध्ये काम करणाऱ्या 3,000 लोकांना काढलं
  • ईदसाठी उत्तर प्रदेशच्या घरी आलेले नवाझुद्दीन सिद्दीकी हे कुटुंबीयांसह 14 दिवस होम क्वारंटीनमध्ये.
  • राज्यात आजपर्यंत 70 हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी, 50 हजार प्रत्यक्षात सुरू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कोरोनाला रोखण्यासाठी दीड आठवड्यांपासून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतोय - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

  उद्या पुन्हा भेटू... बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर...

 6. सचिन गोगोई

  बीबीसी मॉनिटरिंग

  कोरोना

  कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: 'त्यांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत झाकणारं पीपीई किट वापरलंय'

  केस कापताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं शक्य नसल्याने सलूनमध्ये जावं का? याचा लोक विचार करतायत. भारतात काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल झालंय. गुजरातमधल्या एका सलूनने नामी शक्कल लढवली.

 8. मुंबईत 'समोसा पार्टी' आयोजित करणाऱ्यांनावर गुन्हा दाखल

  मुंबईतील घाटकोपरमधील सोसायटीत समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आलं असताना, अशा प्रकारची पार्टी आयोजित केल्यानं पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

  “सोसायटीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सोसायटीचे सचिव आणि आयोजक दोघांची नावे घेतली आहेत. समोसा आणि संगीत कार्यक्रम सुरू होता. किती लोकं होते याची माहिती घेत आहोत,”अशी माहिती घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली.

  घाटकोपर
 9. एक जूनपासून दिवसाला 200 ट्रेन धावतील - भारतीय रेल्वे

  1 जून 2020 पासून दिवसाला 200 ट्रेन धावतील, अशी माहिती भारतीय रेल्वेनं ट्विटरवरून दिलीय. या ट्रेन वातानुकूलित नसतील. शिवाय, द्वितीय श्रेणी कोचच्या या ट्रेन असतील.

  अडकलेल्या मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त 200 ट्रेन असतील, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट सांगितलंय.

  लवकरच ऑनलाईन बुकिंग सुरू केली जाईल. तिकीट बुकिंगबाबत अद्याप सविस्तर माहिती रेल्वेकडून देण्यात आली नाहीय.

  दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्यासाठी आतापर्यंत 1600 श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या. यातून 21.5 लाख मजुरांना रेल्वेनं आपापल्या राज्यात पोहोचवलं.

  रेल्वे
  Image caption: भारतीय रेल्वेनं ट्वीट करून नव्यानं सुरू होणाऱ्या ट्रेनबद्दल माहिती दिली.
 10. गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12,141 वर पोहोचली

  गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसतेय. गुजरातमधील रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 141 वर पोहोचलीय.

  एकट्या अहमदाबादमध्ये 8 हजार 945 रुग्ण आढळले आहेत.

  कोरोना
 11. डेन्मार्क

  नेदरलँडमध्ये आतापर्यंत एकूण 43 हजार 880 रुग्ण आणि 5 हजार 500 हून अधिक मृत्यूंची नोंद झालीय.

  अधिक वाचा
  next
 12. जेम्स गॅलाघर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

  कोरोना व्हायरस

  सध्या जगभरातले 80 गट कोरोना व्हायरसवरची लस शोधण्यासाठी झपाटून काम करत आहेत.

  अधिक वाचा
  next
 13. महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली

  महाराष्ट्रात आज 2100 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली आहे.

  महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही आकडेवारी दिल्याचं PTI नं सांगितलंय.

  कोरोना व्हायरस
 14. ल

  राज्यात ग्रीन, ऑरेंज, रेड तसंच कंटेनमेंट झोनमध्ये नेमकं काय सुरू राहणार आहे? यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 15. परदेशातून महाराष्ट्रात आतापर्यंत 1,972 नागरिक आले

  वंदे भारत अभियानांतर्गत 10 देशातून 13 फ्लाईट्सद्वारे 1,972 नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. यात मुंबईतील 822 प्रवासी आहेत, उर्वरित महाराष्ट्रातील 1,025, तर इतर राज्यातील 125 प्रवासी असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयानं दिली.

  अजून 27 फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहेत.

  कुठल्या देशातून किती नागरिक परतेल?

  • लंडनहून 653
  • सिंगापूरहून 243
  • मनिलाहून 150
  • सॅन फ्रान्सिस्कोहून 107
  • ढाक्याहून 107
  • न्यूयॉर्कहून 208
  • क्वाललंपूरहून 201
  • शिकागोहून 195
  • कुवेतहून 2
  • आदिस अबबावरून 78
  • काबूल 12
  • मस्कत-ओमानहून 16
 16. वर्ल्ड हेल्थ असेम्बली कोरोनाबाबत स्वतंत्र चौकशी करणार

  कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी वर्ल्ड हेल्थ असेम्बली करणार आहे.

  ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानसह 100 देशांच्या वतीन युरोपीयन महासंघाद्वारे यासंबंधीचा प्रस्ताव वर्ल्ड हेल्थ असेम्बलीच्या वार्षिक सभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर कुणीही आक्षेप नोंदवला नाही.

  बहामाचे राजदूत आणि वर्ल्ड हेल्थ असेम्बलीचे अध्यक्ष केवा बैन यांनी सांगितलं, "कुणीही प्रस्तावावर आक्षेप नोंदवला नसल्यानं या प्रस्तावाशी सर्वजण सहमत आहेत असं ग्राह्य धरतो."

 17. BEST च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  मुंबईतील BEST च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यामुळे लागण झालेल्या एकूण BEST कर्मचाऱ्यांची संख्या 137 वर पोहोचली आहे. BEST च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ANI ला ही माहिती दिली.

  View more on twitter
 18. स्थलांतरित मजूर गावी चालल्यामुळे मुंबई-पुणे ठप्प होईल का?

  मुंबईत परराज्यांमधील हजारो-लाखो लोक कामसाठी स्थायिक झालेले आहेत. मात्र, हे लोक परत आपापल्या गावी गेल्यास मुंबई ठप्प होईल का? पाहा यावरील सोपी गोष्ट :

  View more on facebook
 19. चिंकी सिन्हा

  बीबीसी प्रतिनिधी

  शरद उघाडे

  2011 सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील झोपडपट्टीतील 60 टक्के घरांमध्ये शौचालय नाही. नाईलाजाने रहिवाशांना सार्वजनिक शौचालय वापरावे लागत आहे.

  अधिक वाचा
  next