नालेसफाई कामगारांची व्यथा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नालेसफाई कामगारांची व्यथा : 'गाय मेली तर बोभाटा होतो, आमचं काय?'

दिल्लीतील हिरन कुडना भागातून वाहणाऱ्या नाल्याच्या जवळपास चहुबाजूला पसरलेल्या दुर्गंधीमुळे श्वास घेणंसुद्धा कठीण झालं होतं.

नीतू आणि अजित त्या नाल्यात गळ्यापर्यंत अडकले होते. ते घाण पाणी नाकापर्यंत जात होतं. म्हणून त्यांनी आपलं तोंड बंद करून ठेवलं होतं.

पण पुरेशा संरक्षणाअभावी त्यांच्या जीवाला धोका आहेच.

भारतात या धोक्याचे अनेक बळी जातात. पण या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)