पीक येतं पण शेतीतून जास्त पैसे मिळत नाहीत!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

संघर्षकथा : शेती नको आणि शेतकरी नवराही नको - रुपाली कैलास आहेर

"वडील असते तर मी घरी राहिले असते, खूप शिकले असते," असं नाशिक जिल्ह्यातल्या निवाणे इथली रुपाली कैलास आहेर सांगते.

2015 साली कर्जबाजारीपणाला कंटाळून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांनतर तिचं चार जणांचं कुटुंब रस्त्यावर आलं.

शिक्षणासाठी तिला आणि तिच्या भावाला घर सोडून आश्रमात राहायला जावं लागलं. सध्या रुपाली पाचवीत शिकते.

मोठेपणी डॉक्टर बनून शेतकऱ्यांची सेवा करण्याचं तिचं स्वप्न आहे.

त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. रुपालीची आई आणि मोठी बहिण तिला कसण्याचं काम करत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)