भारतातील ज्युरासिक पार्क
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारतातील 'ज्युरासिक पार्क'मध्ये आहेत 100 कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोरचे जीवाश्म

गुजरातमध्ये समुद्री डायनासोरचं जीवाश्म नुकतंच सापडलं. गुजरातच्या काही भागात 100 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरच्या 13 प्रजाती राहत होत्या, याचे पुरावे सापडले आहेत.

गुजरातमधल्या एका ठिकाणी डायनासोरचे अनेक जीवाश्म आढळतात. या जागेची देखभाल बालासिनोरच्या राजकुमारी आलीया बाबी करतात.

स्थानिकांकडे एकदा त्यांना डायनासोरचं एक अंडं सापडलं. ज्या महिलेकडे अंडं होतं, तिला याची कसलीच कल्पना नव्हती. त्या अंड्याचा वापर ती मसाला वाटायला करायची. हे डायनासोरचं अंडं आहे हे त्यांना नंतर कळलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)