"एका काठीच्या आधारावर आम्ही कसे लढणार?"
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जम्मू-काश्मीर : या आजोबांनी पाहिली भारत-पाकच्या मधली पहिली चकमक

भारत-पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाले, तरी जम्मू-काश्मीर संस्थान स्वतंत्र होतं. पाकिस्तानने ऑक्टोबर 1947मध्ये टोळीवाल्यांच्या मदतीने काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली.

महाराजा हरिसिंग यांना विलिनकरणाच्या करारांवर स्वाक्षरी करावी लागली. त्यानंतर भारतीय लष्कराने टोळीवाल्यांना पिटाळून लावलं. या युद्धातली पहिली चकमक मोहुरामधल्या मोहम्मद सुलतान थाकेर यांनी प्रत्यक्ष बघितली होती.

बीबीसीच्या रिपोर्टर आमीर पीरझादा यांचा रिपोर्ट. चित्रीकरण फैझल एच. भट यांचे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)