पाहा व्हीडिओ - जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलीनला अमेरिकेने बाहेर का काढलं?

पाहा व्हीडिओ - जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलीनला अमेरिकेने बाहेर का काढलं?

मूकपटांची मुहूर्तमेढ चार्ली चॅपलीन यांनी रोवली. त्यांनी अमेरिकेत 80 सिनेमे केले. आणि वयाच्या 23व्या वर्षीच ते जगप्रसिद्ध झाले.

1950च्या दशकात अमेरिकेत उदारमतवाद्यांच्या विरोधात मोहिम सुरू होती. चार्ली चॅपलीन हे कम्युनिस्टांचे समर्थक आहेत, असा आरोप त्यांच्यावर झाला. आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं होतं.

त्यांच्याबद्दलच्या काही जुन्या आठवणी बीबीसीने त्यांच्या मुलाकडून जाणून घेतल्या. चॅपलीन यांच्या घरालाही बीबीसीने भेट दिली, जे आज एक संग्रहालय आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)