मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊनही प्रत्यक्षात कर्जमाफी नाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र दिलेले शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

प्रमोद मोरबाजी गमे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातले शेतकरी. मुंबईतील कर्जमाफीच्या मेगा इव्हेंटमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं.

प्रमाणपत्र मिळाल्याच्या आठ दिवसानंतरही प्रमोद गमे यांच्या बँक खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही. ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरताना सुरुवातीला लिंक्स मिळत नाहीत, मग सर्व सोपस्कार करूनही शेवटी कर्जमाफीसाठी वाटच बघावी लागते, असं प्रमोद गमे म्हणतात.

दरम्यान शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना अनेक अडचणी आल्या असल्याची गोष्ट मान्य असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.

सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

बीबीसी मराठीसाठी गजानन उमाटे यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)