कतार : फुटबॉल विश्वचषकाचं भवितव्य काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कतार : फुटबॉल विश्वचषकाचं भवितव्य काय?

कतारमध्ये 2022 साली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. कामागारांच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप कतारवर केला जात आहे. त्यातून चार महिन्यांपूर्वी शेजारच्या राष्ट्रांनी व्यापारी निर्बंध लादल्यानं बांधकाम सामग्रीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

8 स्टेडीयम आणि 60 हजार निवासी खोल्या बांधण्याचं शिवधनुष्य कतारला पेलायचं आहे. या निर्बंधाचा काहीच परिणाम होणार नसल्याचा दावा कतार सरकार करत आहे, पण विश्वचषकाच्या तयारीवर संकटाचे ढग दाटले आहेत.

दोहा, कतार येथून बीबीसी न्यूज प्रतिनिधी उमर द्राझ यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)