शीखविरोधी दंगली 1984 साली अशा उसळल्या होत्या

शीखविरोधी दंगली 1984 साली अशा उसळल्या होत्या

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1 नोव्हेंबरच्या दिवशी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं.

'ऑपरेशन ब्लू स्टार' दरम्यान अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लष्कर शिरलं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ऑपरेशनला हिरवा कंदील दिला होता.

आपल्या पवित्र स्थानाचा अपमान झाल्याचा राग शिखांच्या मनात होता. त्यातूनच 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली.

ही हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच केली. आणि त्यानंतर शिखांविरोधात हिंसाचार सुरू झाला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)