रशियन क्रांतीची 100 वर्षं : सोव्हिएत युनियनचा झेंडा कसा आकारास आला?

कम्युनिस्ट विचारधारेचं प्रतीक असलेल्या विळा-हातोडी या चिन्हाला इतिहासात विशेष ओळख आहे. रशियन क्रांतीच्यावेळी बोल्शेविकांनी ते स्वीकारलं होतं.

पण हे चिन्ह आलं तरी कुठून?

क्रांतीकारी कम्युनिस्ट नेते लेनिन रशियात सत्तेवर आल्यानंतर या चिन्हाच्या डिझाईनसाठी स्पर्धा घेण्यात आली. विळा, हातोडी आणि तलवार असलेलं चिन्ह विजयी ठरलं.

कामगारांची शक्ती या चिन्हातून दाखवण्याचा विचार होता. हातोडी म्हणजे शहरी किंवा कारखान्यांमधली कामगार शक्ती आणि विळा हे ग्रामीण किंवा शेतात राबणाऱ्यांची शक्ती, अशी त्यामागची संकल्पना होती.

रशियन क्रांतीला 7 नोव्हेंबरला एक शतक पूर्ण होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया कसं हे चिन्ह सोव्हिएत युनियनच्या ध्वजाचा मुख्य भाग बनलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)