नोटबंदी: ठाण्यातल्या 'कॅशलेस' धसईत पुन्हा कॅशचाच खणखणाट

नोटबंदी: ठाण्यातल्या 'कॅशलेस' धसईत पुन्हा कॅशचाच खणखणाट

8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली.

त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील धसईला "देशातलं पहिलं कॅशलेस गाव" म्हणून सरकारने घोषित केलं.

नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही या गावातली परिस्थिती पाहण्यासाठी गेलो, तेव्हा लक्षात आलं की गावात सर्व रोख व्यवहार सुरू होते.

गाव कॅशलेस होण्यासाठी इंटरनेट आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं होतं.

बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)