मेंढ्याही ओळखू शकतात माणसाचा चेहरा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : मेंढ्याही ओळखू शकतात माणसाचा चेहरा!

मेंढ्या या चेहऱ्यावरुन माणसाला ओळखू शकतात, असं केंब्रिज विद्यापीठानं केलेल्या संशोधनातून पुढे आलं आहे.

या संशोधनासाठी केंब्रिज विद्यापीठानं 'वेल्श माउंटन' जातीच्या आठ मेंढ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं. अनोळखी चेहऱ्यांमधून त्यांनी सेलेब्रिटींना अचूकपणे ओळखलं.

प्रयोगांदरम्यान बराक ओबामा आणि एमा वॉटसनसारख्या सेलेब्रिटींचे चेहरे या मेंढ्या ओळखू शकल्या.

या शोधामुळे मानवी मेंदूशी संबंधित आजारांना समजण्यास आणखी मदत होईल, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

अधिक माहितीसाठी वाचा : मेंढ्याही ओळखू शकतात माणसाचा चेहरा!

(पॉल रिंकन, बीबीसी सायन्स एडिटर यांचा रिपोर्ट)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)