'मदतीचं फक्त आश्वासनच मिळालं...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भुवनेश्वरचा धावपटू बुधिया सिंहची सरकारकडून उपेक्षाच

ओडिशातील भुवनेश्वरच्या गरीब वस्तीत वाढलेल्या बुधिया सिंहने लहानपणीच 65 किलोमीटरची मॅरेथॉन सात तासांमध्ये पूर्ण करून जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण त्यानंतर त्याला कोणाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही.

सरकार आणि खासगी कंपन्यांनीही त्याला मदतीचं फक्त आश्वासनच दिलं. आर्थिक मदतीचा अभाव आणि प्रशिक्षकांचा खून झाल्यामुळे यामुळे बुधिया 2006पासून स्पर्धांमध्ये खेळलाच नाही.

आता मात्र तो कंबर कसून तयारीला लागला आहे. ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून गोल्ड मेडल जिंकण्यासाठी त्याचा सराव सुरू झाला आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांचा भुवनेश्वरहून रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)