पंजाबमध्येही बाबासाहेबांचा डंका!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पंजाबमधील दलित समाज शिक्षणात अग्रेसर

पंजाबमधील चर्मकार समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपलं दैवत मानतो. बाबासाहेब शिक्षणासाठी किती आग्रही होते, हे या समाजाला माहीत आहे.

या समाजानंही आता शिक्षणाची कास धरली आहे. कोणत्याही झगड्यात न पडता शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरी करावी, असं स्वप्न या समाजातील तरुण उराशी बाळगतो.

याच ध्यासातून या समाजातील कलाकारही आपली कला जोपासत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी गाणारी गाणीही रचली आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)