पहिल्या महायुद्धाशी नातं सांगणारं कोकणातलं गाव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तरंदळे गावातील 52 शूरवीरांचा पहिल्या महायुद्धात सहभाग

पहिलं महायुद्ध संपलं या घटनेला आज बरोबर 99 वर्षं झाली.

भारत देश तेव्हा पारतंत्र्यात होता. पण, जवानांच्या काही तुकड्या ब्रिटिश सेनेकडून लढल्या. कोकणातल्या तरंदळे गावातले 52 वीर या युद्धात सहभागी झाले होते. यातले 50 परत आले. तर दोघांना वीरमरण आलं.

या गावाची आणि त्या वीरांची ही कहाणी.

वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात एक विजयस्तंभ उभा आहे. आजही गावातील तरुणांना हा स्तंभ प्रेरणा देतो. पण, सरकारचं मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं आहे.

(बीबीसी मराठीसाठी एम. खान यांचा रिपोर्ट)

या बातम्या वाचल्यात का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)