"बोलण्याची धमक असल्यामुळेच मी माझा बालविवाह थांबवू शकले!"
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शिक्षणासाठी बंड पुकारत सुनिताने रोखला स्वत:चा बालविवाह

लहान वयात लग्न झालं तर शिक्षण पूर्ण करता येणार नाही, म्हणून सुनिताने तिच्या बालविवाहाला विरोध केला.

जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करून तिच्यावर लग्नासाठी होणाऱ्या जबरदस्तीची माहिती दिली. त्यांनीही उशीर न करता स्वातीच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि तिचा बालविवाह थांबवला.

आज सुनिता ना केवळ आपल्यावर घडलेल्या प्रसंगातून स्वत: सावध झाली आहे, ती समाजात एक सावधतेचा संदेश पसरवत आहे.

बीबीसी मराठीसाठी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक यांचा रिपोर्ट.

शूटिंग - अमेय पाठक

स्वाती सध्या बारावीत शिकते. मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)