शांत राहण्यासाठी जास्त शक्ती लागते : माहिरा खान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'रईस' फेम माहिरा खान म्हणते, 'कलेला सीमा असू नये'

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सोबत तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मध्यंतरी चर्चेत आली होती. रणबीर कपूरसोबत धुम्रपान करताना तिच्या फोटोवरून सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगला सामना करावा लागला होता.

बीबीसी प्रतिनिधी शुमैला जाफरी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये हा वाद आणि भारतात काम करण्याच्या अनुभवावर तिनं मत व्यक्त केलं आहे.

“शांत राहण्यासाठी जास्त शक्ती लागते,” ती म्हणाली. “नक्कीच मी यावर बोलणार आहे. आताही मी काहीही बोलले तर त्यातील एक शब्द उचलून बातमी केली जाते. मला वाटतं की यावर बोलण व्यर्थ आहे.”

“भारतात काम करण्याचा अनुभव फारच छान होता. एकतर मी शाहरूख खान सोबत काम करत होते. मी मनात ठरवलं होतं की काम केलं तर शाहरूख बरोबरच,” असंही ती म्हणाली.

सध्या काही नवीन भारतीय सिनेमे हातात आहेत का, असं विचारल्यावर ती म्हणाली, “सध्यातरी हातात काही नाही. सध्या वातावरण तसं नाही.”

अशा देवाण-घेवाणीला विरोध करणारे दोन्हीकडे आहेत, या बद्दल तिला काय वाटतं? “मला असं वाटतं की कलेला सीमा असू नयेत.”

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)