इराक-इराण भूकंपात मृतांचा संख्या 400वर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : टीव्हीवरच्या लाईव्ह चर्चेत भूकंप होतो तेव्हा...

इराक आणि इराणच्या उत्तरेकडील सीमेवर रविवारी झालेल्या भूकंपात 400हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेच्या या भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.

या भूकंपाचा केंद्रबिंदू इराक-इराण सीमेजवळच्या हलाज्बापासून 30 किलोमीटर दूर तर जमिनीखाली 33.9 किलोमीटर खोलवर होता. संयुक्त राष्ट्रानुसार या केंद्रबिंदूभोवतालच्या 100 किमी परिघात जवळजवळ 18 लाख लोक राहतात.

एका संस्थेनुसार जवळ जवळ 70,000 लोकांना मदतीची गरज आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)