पहिल्या विश्व युद्धात लढलेले 2 भारतीय सैनिक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पहिल्या विश्वयुद्धात लढलेल्या 2 भारतीयांवर 100 वर्षांनतर झाले अंत्यसंस्कार

पहिल्या विश्वयुद्धात फ्रान्सच्या भूमीवर लढताना अनेक भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी दोघांवर फ्रांसच्या लवंटीमध्ये नुकतंच अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंडियन गढवाल रेजिमेंटच्या बॅजमुळं त्यांच्या अवशेषांची ओळख पटली.

फ्रान्समध्ये दरवर्षी भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी इथले नागरिक नव्ह शॅपेलच्या भारतीय स्मृतीस्थळावर एकत्र येतात. त्यांच्या बलिदानाची आजही फ्रान्समध्ये आठवण काढली जाते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)