मलमूत्रापासून सार्वजनिक संडासांची देखभाल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

BBC INNOVATORS : मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि सार्वजनिक संडासांची देखभाल!

वर्ल्ड टॉयलेट डेनिमित्त बिहारमधल्या एका अनोख्या उपक्रपमाची माहिती.

भारतातील ग्रामीण भागाताली 50 लाख लोक उघड्यावर संडासला जातात. त्यातून आरोग्याच्या आणि सामाजिक समस्या उभ्या राहतात. 2019पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारचा आहे.

सॅनिटेशन अँड हेल्थ राईटस (श्री) या संस्थेने बिहारमध्यल्या मागास आणि ग्रामीण भागात सार्वजनिक संडास बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

विशेष म्हणजे या संडासात निर्माण होणाऱ्या मलमूत्रावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. ही वीज विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरली जाते.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी 50पैसे लीटर या दराने विकलं जातं. हीच रक्कम या संडासांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरतात.

आहे का नाही, आयडिया! बीबीसीच्या या प्रकल्पाला बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून अर्थसाहाय्य मिळालं आहे.

आमीर रफीक पीरजादा (बिहार) यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)