पंखाशिवाय उडणारा माणूस!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पंखांशिवाय उडणारा माणूस पाहिला आहे का तुम्ही?

जेम्स प्रेस्टवूड पंखांशिवाय उडतो. नवल वाटलं ना ऐकून? पण हे खरं आहे. एका जेट स्की सूटच्या साहाय्यानं तो हे अशक्य काम करतो.

एकदा तो परदेशात गेला होता. त्या ठिकाणी त्याने स्की सूट घालून अशा प्रकारे पाण्याच्या फवाऱ्यासरशी उडणारा माणूस पाहिला. तो भारावून गेला आणि त्यानेही असं 'उडण्याचं' ठरवलं.

तब्बल 21 लाख रुपयांचं किट त्यानं घेतलं आणि त्याची ही धमाल सुरू झाली. जेट स्कीच्या फवाऱ्यासाठी इंधनाचा खर्च तासाला 9,000 रुपये इतका येतो.

जेम्स प्रेस्टवूड वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो. त्याला साहसी क्रीडाप्रकारांच्या जागतिक स्पर्धेतही भाग घ्यायचा आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)