'डोक्यावर छप्पर' देणारा तरुण
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#BBC Innovators : गरिबांच्या 'डोक्यावर छप्पर' देणारा तरुण

अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या हासित गणात्रा यांनी या लोकांसाठी काही करण्याचा निश्चय केला.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि आरामदायक घरं बांधता येतील का, असा विचार हासित करू लागले. कार्डपेपर आणि पुठ्ठे वापरून छत करायचं पण ते वॉटरप्रूफ तर असलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

दोन वर्षं सतत 300हून अधिक वेळा प्रयत्न केल्यानंतर हासित यांनी वॉटरप्रूफ छत बनवलं आणि नंतर एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव आहे, मॉडरूफ.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)