अमेरिकेेचे मांजरमित्र
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

झाडांवर अडकलेल्या मांजरांची सुटका करतात हे मांजरमित्र

मांजरी सतत मस्ती करत असतात. सतत इकडून तिकडे धावपळ, चेंडूसोबत खेळणं त्यांना आवडतं. आणि त्यातच अनेकदा त्या नको त्या जागी अडकून बसतात.

त्यांची उंचीवरून खाली उडी मारण्याचं कौशल्य कमाल असतं. पण कधी कधी फाजिल आत्मविश्वासात त्या भलत्याच ठिकाणी जाऊन बसतात.

मग त्यांना तिथून काढायला खूप कसरत करावी लागते.

अमेरिकेतही एखादं मांजर झाडावर चढून बसलं की लोक टॉम आणि शॉन या दोघांना बोलवतात. हे दोन "मांजरमित्र" मग सरसर वर चढतात आणि त्या मांजरीला सोडवून आणतात.

त्यासाठी या दोघांना 2008 साली 'कॅनोपी कॅट रेस्क्यू'ची स्थापना केली.

त्यांची प्रेरणा काय?

"मांजराची सुटका केल्यानंतर त्यांच्या मालकांना होणारा आनंद आम्हाला प्रोत्साहन देतो," असं ते म्हणतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)