उत्तर कोरियाच्या जवानाचं नाट्यमय पलायन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाच्या जवानाचं नाट्यमय पलायन

उत्तर कोरियाचा एक जवान दक्षिण कोरियाच्या दिशेनं निघाला. ६० वर्षांत अशी आगळीक होण्याची ही तिसरीच घटना.

सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. काही तर पॉइंट ब्लॅंक रेंजवरून होत्या.

त्यात हा जवान जखमी झाला, पण सीमा ओलांडण्यात तो यशस्वीही झाला. त्याला दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

आता त्याची तब्येत सुधारत आहे.

United Nations Commandकडून देण्यात आलेल्या फूटेजमुळे 19 नोव्हेंबरची घटना उघडकीस आली.

हे नाट्य अवघं 45 मिनिटं चाललं. कोणी ठार झालं नाही. परंतु हे सगळं आणखी भयानक होऊ शकलं असतं.

हेही वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)