गुजरातच्या या गावात मुलींची संख्या कमी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#BBCGujaratOnWheels : गुजरातच्या या गावात मुलींची संख्या कमी का?

BBC गुजरात ऑन व्हील्सची टीम गुजरातच्या मेहसाणामधल्या ककासणा गावात पोहोचली. तेव्हा आजही या गावात मुलींकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला नाही, असं दिसलं.

मुलींना आजही तिथे दुय्यम स्थान आहे. इथल्या बायका हे मान्य करतात की, गर्भलिंगचाचणी केली जाते आणि मुलगी असेल तर त्यांच्या गावात गर्भपातही केला जाऊ शकतो.

मुलींना आजही मनासारखं शिक्षण घ्यायचं स्वातंत्र्य या गावात नाही. त्यांचं लग्नही लवकर केलं जातं.

रिपोर्ट - लिन्सी मायकल, शालू यादव, नेहा शर्मा, जय मकवाना आणि आमिर पीरजादा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)