मी रस्त्यवार राहते पण भिकारी नाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - 'आम्ही रस्त्यावर राहतो पण भिकारी नाही'

1959च्या 'मुंबई भिक्षेकरी प्रतिबंध कायद्या'नं भीक मागण्यावर प्रतिबंध घातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्यानं भीक मागणं हा गुन्हा ठरतो. मुंबईत दररोज अनेक भिक्षेकऱ्यांना या कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांकडून अटक केली जाते.

यात भिक्षेकऱ्यांसोबत बेघर नागरिकांवरही कारवाई होत असल्याचं निरीक्षण 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'च्या अभ्यासकांनी नोंदवलं आहे.

तसंच शहानिशा केल्याशिवाय चुकीच्या व्यक्तींवर पोलिसी कारवाई होत असल्याचं कारवाई झालेल्यांकडूनही सांगण्यात येत आहे.

बीबीसी मराठीसाठी मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट... सविस्तर वाचा - 'तुमची भीक नको पण पोलिसांना आवरा'

शूट आणि एडिट - शरद बढे

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)