पाहा व्हीडिओ : बिब्बे फोडणाऱ्या महिला कामगारांसाठी रोजगारच ठरतोय घातक

वाशिम जिल्ह्याला अजूनही मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा आहे. इथल्या 75 गावांमध्ये अजूनही बिब्बे फोडणं हाच रोजगाराचा मुख्य स्रोत आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या अनेक महिला बिब्बे फोडण्याचं काम करतात. पण बिब्बे फोडताना निघणारं तेल या महिलांच्या आरोग्याला अपायकारक ठरतं.

बिब्ब्यातून मिळणाऱ्या गोडंबीचा वापर औषध म्हणून केला जातो. या गोडंबीला मोठी मागणी असते.

बिब्ब्यातून निघणाऱ्या तेलामुळे त्यांच्या त्वचेवर डाग पडतात, त्वचा 'जळते' असं त्या म्हणतात. याचा परिणाम असाही आहे की, अनेक तरुण मुलींची लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत.

महिला कामगारांशी प्रत्यक्ष बोलून बीबीसीने ही परिस्थिती जाणून घेतली.

(नितेश राऊत, वाशिम यांचा बीबीसीसाठी रिपोर्ट)

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)