'डाऊन सिंड्रोम'ने ग्रस्त आदितीचा 'कॅफे' मात्र अप
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : डाऊन सिंड्रोम असणारी आदिती वर्मा कशी चालवते स्वत:चं 'कॅफे'

नवी मुंबईच्या बेलापूर उपनगरात भूमी मॉलमध्ये 'आदितीज कॉर्नर' नावाचं एक कॅफे आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेलं हे कॅफे परिसरात लोकप्रिय आहे. आणि याच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण आहे या कॅफेची मालकीण आदिती वर्मा.

आदिती वर्माला डाऊन सिंड्रोम हा आजार आहे. पण अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कॅफेची सर्व जबाबदारी आदितीने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

कॅफेसाठी लागणाऱ्या एकेका सामानाची ऑर्डर देणं, ग्राहकांच्या ऑर्डर घेणं, त्यांना डिलिव्हरी देणं आणि या सर्वांचा हिशोब ठेवणं, सगळं ती स्वतः पाहाते.

तिच्या या कॅफेत नेहमी तरूण तरूणींची वर्दळ असते. तिने उचललेले हे पाऊल अनेक विकलांग व्यक्तींसाठी पायवाट तयार करत आहे.

आणखी वाचा -

बीबीसी मराठीसाठी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)