कोणीतरी आजारी आहे, असं सांगून रेखाला (बदलेलं नाव) गावाकडं बोलावून घेण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी आपलं लग्न होणार आहे, हे तिला समजलं.
पण तिला इतक्या लहान वयात लग्न करायचं नव्हतं. तिला शिकून स्वत:ची स्वप्नं पूर्ण करायची होती.
मग तिनं घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश न आल्यावर तिनं तिच्या शिक्षणाची सोय करणाऱ्या संस्थेला मेसेज केला. आणि लग्नाच्या अवघ्या दोन दिवस अगोदर स्वत:चा बालविवाह थांबवला.
शूटिंग - सागर कासार
एडिटिंग - श्रीकांत बंगाळे आणि सिद्धनाथ गानू
हे वाचलंत का?
- राणी पद्मावती खरंच अस्तित्वात होती की कविकल्पना होती?
- साडी हा हिंदुत्ववादी पोशाख आहे का?
- मोरोक्कोतल्या या मशिदीत वीज तयार होते
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)