गुजरातमध्ये दूध व्यवसायात महिलाच आघाडीवर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ #BBCGujaratOnWheels : गाई पाळून घर चालवत आहेत गुजरातच्या महिला

बीबीसी #BBCGujaratOnWheels ची टीम गुजरातच्या आणंद जिल्ह्यातल्या सेखडी गावात पोहोचली. धवलक्रांतीनंतर आणंदचं नाव देशभरात प्रकाशझोतात आलं होतं.

इथल्या महिलांनी कुटुंबाला आधार म्हणून गाई पाळण्यास सुरुवात केली आहे. या गाईंचं दूध विकून त्या घरखर्चाला हातभार लावत आहेत.

या गावातील बहुतांश महिला या पशुपालन करतात. काही कुटुंबामध्ये महिलांच्या तीनही पिढ्या दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात.

घर चालवण्यात पुरुषांपेक्षाही जास्त वाटा या महिला उचलत आहेत.

रिपोर्ट - शालू यादव, जय मकवाना

शूटिंग आणि एडिटिंग - नेहा शर्मा, आमिर पीरजादा

आणखी पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)