अगदी पहिल्या भेटीत वाटलं हीच ती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : अगदी पहिल्या भेटीतच वाटलं हीच ती - प्रिन्स हॅरी

ब्रिटीश युवराज प्रिन्स हॅरी लवकरच त्यांची अमेरिकन गर्लफ्रेंड मेगन मार्कलशी विवाह करणार आहेत. या एंगेजमेंटची घोषणा कालच करण्यात आली. एंगेजमेंटनंतर ते पहिल्यांदाच अधिकृतपणे जगासमोर आले.

पत्रकारांच्या आग्रहावरून केंजिंग्टन पॅलेसमध्ये त्यांनी हा खास 'फोटोकॉल' दिला. प्रिन्स हॅरी यांना पत्रकाराने प्रश्न विचारला "हॅरी, कधी वाटलं हीच ती?" त्यावर हॅरीने उत्तर दिले, "अगदी पहिल्या भेटीत!" 2018च्या वसंतात हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)