'भारतीयांनी हिंदीचा आदर करायला हवा'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अस्खलित हिंदी बोलणारा दुबईतला अरब शेख

दुबईतला एखादा अरब म्हटल्यावर तो आपल्याला अगम्य अशा भाषेत काहीतरी बोलणार, अशी आपली अपेक्षा असते.

पण दुबईतले मोठे उद्योजक असलेले सुहैल मुहम्मद अल-जरूनी हे, तुम्ही भारतीय आहात हे कळल्यावर लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतात.

दुबईच्या राजघराण्याशी जवळचे संबंध असलेले अल-जरूनी यांची दुबईतच 250 घरं आहेत. तब्बल सात हजार गाड्यांच्या मिनिएचर मॉडेल्सच्या त्यांच्या संग्रहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

त्यांना भारतीय संस्कृतीचं विशेष आकर्षण आहे. तसंच हिंदी चित्रपटांची खूप आवड आहे. दिलीप कुमार आणि राज कपूर त्यांना आवडतात. त्यांच्या मते कपूर घराणं हे हिंदी चित्रपटसृष्टीचं राजघराणं आहे.

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांचा रिपोर्ट.

शूटिं-एडिटिंग - ताहीर इम्रान.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)