उडत्या विमानात बसता आलं तर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : आणि त्या दोघांनी चक्क उडत्या विमानात लँडिंग केलं!

एखाद्या पर्वतावरून किंवा कधी विमानातून तर उडी मारताना अनेकांना बघितलं आहे. स्कायडायविंगचं क्रेझ जगभरात वाढत आहेच.

पण विंगसूट घालून एका पर्वतावरून उडी घ्यायची आणि चक्क एका उडत्या विमानात उडी मारली तर? कल्पनाही भारी आहे ना!

फ्रेड फुगन आणि व्हिन्स रफेट यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं.

अॅल्प्स पर्वतांवरून त्यांनी फक्त उडीच नाही मारली तर खरंच उडत्या विमानात लँडिंग केली!

हा क्षण या व्हीडिओमध्ये दिसता तितका सोपा नव्हता. ही किमया करण्यासाठी या दोघांनी आधी शंभराहून अधिकवेळा सराव केला होता.

आणखी पाहा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)