उत्तर कोरियाच्या मिसाईल टेस्टची बातमी देणारी ही बाई आहे तरी कोण?

अधून मधून उत्तर कोरियानं मिसाईल टेस्ट केल्याची बातमी येत असते. त्याची जाहीर घोषणा कधी रेडिओ तर कधी टीव्हीवरून सर्वप्रथम होते.

मात्र कोरियन सेंट्रल टीव्हीवर हीच एक महिला नेहमी ही घोषणा करते. तिचं नाव आहे री चुन-ही.

चुन-ही गेल्या 40 वर्षांपासून बातम्या देत आहेत. आज त्या त्यांच्या सत्तरीत आहेत.

त्यांच्या नाट्यमय निवेदनाचे कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन सुद्धा मोठे फॅन आहेत.

खरं तर त्या निवृत्त झाल्या आहेत. पण अमेरिका आणि उत्तर कोरियात वाढता तणाव पाहता त्यांना इतक्यात आराम मिळेल, असं वाटत नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)